Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedभविष्यात प्लास्टिक उद्योगाला मोठी संधी - रविंद्र गुगले *असोसिएशन फॉर द प्रमोशन...

भविष्यात प्लास्टिक उद्योगाला मोठी संधी – रविंद्र गुगले *असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स (एपीपी) तर्फे प्लास्टो मीट संपन्न

 

पुणे,6 सप्टेंबर 2024 : इंजिनिअरींग प्लॅस्टिक्स ते पॉलीप्रॉपीलिन (पीपी) ते विकसित होणाऱ्या ईव्ही उद्योगाला लागणाऱ्या सुट्या भागांपर्यंत प्लॅस्टिक उद्योगाच्या प्रत्येक शाखेला मोठी संधी आहे,असे मत टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सचे वरिष्ठ सरव्यवस्थापक रविंद्र गुगले यांनी व्यक्त केले. असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स (एपीपी) तर्फे पीवायसी जिमखाना येथे आयोजित प्लास्टो मीट या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून उद्योजक,राजकारणी व अभिनेते रमेश परदेशी यांसह एपीपीचे अध्यक्ष अनिल नाईक,खजिनदार प्रणव बेल्हेकर,सचिव समीर कोठारी,उपाध्यक्ष एन.शंकररमण आणि माजी अध्यक्ष अजय झोड उपस्थित होते.

 

प्लास्टो मीट हा कार्यक्रम एपीपीचा प्रमुख उपक्रम असलेल्या प्लास्टो प्रदर्शनाचा प्रसार करण्याकरिता विविध ठिकाणी आयोजित केला जातो.यावर्षी हे प्रदर्शन 8 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान मोशी इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे अधिक भव्य व व्यापक पातळीवर आयोजित केले जाणार आहे.

 

प्लास्टिक हे कमी खर्चात टिकाऊ,मजबूत आणि कार्यक्षम पर्याय प्रदान करते.ईव्ही उद्योगाचे उदाहरण देताना रविंद्र गुगले पुढे म्हणाले की,ऊर्जा कार्यक्षम उत्पादनांची मागणी वाढणार असून कमी वजनाच्या प्लास्टिक उत्पादनांची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढेल.आजच्या काळात प्रदर्शनाला भेट देणारे व्यावसायिक फक्त प्रदर्शित झालेली उत्पादने पाहायला येत नाहीत तर,त्यांच्या गरजेनुसार सोल्युशन्स शोधत असतात.पुण्यात मेजरिंग इन्स्ट्रुमेंटस,गेज इंडस्ट्री,डाय मेकिंग,क्रिटिकल मोल्डींग यांसह प्लास्टिक उद्योगाचा एक भक्कम पाया आहे,त्यामुळे प्लास्टो 2025 च्या माध्यमातून सर्व भागधारकांना त्यांच्या गरजेनुसार उपाय प्रदान करणे गरजेचे आहे.यासाठी नवकल्पनांची गरज असून प्लास्टिक उद्योगात परिवर्तनाच्या पुढच्या टप्प्यासाठी हा योग्य काळ आहे.

 

प्लास्टिक रिसायकलिंगमध्ये अधिक कार्यक्षमतेची गरज

 

रविंद्र गुगले म्हणाले की,ईएसजी (एनव्हायरमेंटल,सोशल आणि गव्हर्नन्स) अनुपालन हे केवळ मोठ्या उद्योगांना नाही तर मध्यम व छोट्या उद्योगांसाठी देखील गरजेचे आहे. ईएसजी अनुपालनामुळे अधिक ग्राहक आकर्षित होतील आणि मध्यम व लघुउद्योजकांना त्याचा फायदा होईल.प्लास्टिक रिसायकलिंगमध्ये अधिक कार्यक्षमतेची गरज आहे,असे ते म्हणाले.

 

प्लास्टो 2025 बाबत माहिती देताना एपीपीचे अध्यक्ष अनिल नाईक म्हणाले की,मोशी इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे होणाऱ्या व 1 लाख चौरस फुटावर विस्तारलेल्या या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असून 70 टक्के बुकिंग याआधीच झाले आहे.

 

एपीपीचे माजी अध्यक्ष अजय झोड म्हणाले की,प्लास्टिक उद्योगाच्या विकासासाठी काम करणे हे आमच्या संघटनेचे उद्दिष्ट आहे.सर्व भागधारकांना एकत्र आणून प्लास्टिकचा योग्य वापर करून त्याचा सकारात्मक प्रभाव आणि शाश्वत विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.या प्रदर्शनाच्या माध्यमातून अधिक चांगल्या व हरित भविष्यासाठी शाश्वत प्लास्टिक या संकल्पनेवर लक्ष केंद्रित केले आहे.

 

नवीन उत्पादने सादर करण्यासाठी आणि उद्योगातील उत्कृष्टता प्रदर्शित करण्यासाठी 1989 पासून प्लास्टो हे विश्वासार्ह व्यासपीठ ठरले आहे. पुण्यातील प्लास्टिक उद्योग आणि एमएसएमईच्या कल्याणाकरिता समर्पित ना-नफा संस्था असलेल्या असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स (एपीपी) तर्फे आयोजित प्लास्टो 2025 उद्योगातील प्रमुख नेतृत्व व भागधारकांना अद्वितीय प्रदर्शनाची संधी प्रदान करते. आपल्या ब्रँडची पोहोच वाढवण्यासाठी,संभाव्य ग्राहकांशी जोडण्यासाठी आणि प्लास्टिक क्षेत्राच्या विकासात योगदान देण्यासाठी ही एक अनो

खी संधी आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments