Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorized*गणेशोत्सवानिमित्त देण्यात येणाऱ्या पथकर सवलतीसाठी वैध पास आवश्यक*

*गणेशोत्सवानिमित्त देण्यात येणाऱ्या पथकर सवलतीसाठी वैध पास आवश्यक*

 

पुणे, दि. ६ : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भक्तांना १९ सप्टेंबर पर्यंत पथकर वसुलीतून सवलत देण्यात येणार असून त्यासाठी वाहनधारकांना पास देण्यात आले आहेत. वाहनधारकांकडे वैध पास नसल्यास वाहनांना पथकर भरुन प्रवास करणे अनिवार्य असेल, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम यांनी कळविले आहे.

 

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील खेड शिवापूर पथकर नाका, आनेवाडी पथकर नाका व इतर पथकर नाक्यावर वैध पास असलेल्या वाहनांना कोकणांत जाण्यासाठी पथकरात सवलत देण्याबाबत संबंधितांना कळविण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments