~ या सणासुदीच्या हंगामात फ्लिपकार्टच्या सप्लाय चेन विभागाने ४० पेक्षा अधिक भागांमध्ये १ लाखांहून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
~ वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने देशभरात १३ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या ११ फुलफिलमेंट सेंटर्सच्या लॉन्चसह आपले संपूर्ण भारतात सप्लाय चेन नेटवर्क अधिक मजबूत केले आहे.
बंगळुरू- सप्टेंबर २०२४- फ्लिपकार्ट कंपनी त्यांचा द बिग बिलियन डेज (TBBD) या त्यांच्या वार्षिक सोहळा साजरा करण्यास करण्यास सज्ज झाला आहे या सोहळ्याच्या माध्यमातून उत्कृष्टतेचे नवे आयाम प्रस्थापित केले जाणार आहेत. त्यासाठी फ्लिपकार्टने ९ शहरांमध्ये ११ नवीन फुलफिलमेंट सेंटर उभारले आहेत. त्यामुळे या सेंटर्सची एकूण संख्या आता ८३ झाली आहे. या सामाजिक आर्थिक विकासाबरोबरच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करण्यावर फ्लिपकार्टने लक्ष केंद्रित केलं असून देशभरात सप्लाय चेन क्षेत्रात १ लाख नवीन नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत. रोजचं कामकाज अधिक सुलभ करण्याबरोबरच स्थानिक समुदायाची प्रगती आणि आर्थिक विकास हे या वर्षीच्या सणासुदीच्या मोसमातलं उद्दिष्ट आहे. याअंतर्गत सप्लाय चेन विभागात. इन्व्हेंटरी मॅनेजर, वेअरहाऊस असोसिएट, लॉजिस्टिक्स कोऑर्डिनेटर, किराणा पार्टनर आणि डिलिव्हरी ड्रायव्हर्स यासारख्या अनेर संधी उपलब्ध होतील.
या सणासुदीच्या मोसमात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सप्लाय चेनचं सुरळीत कामकाज, सुलभ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, आणि वाढत्या मागणीला न्याय देण्यासाठी उत्पादनांची उपलब्धता यावर भर दिला जाणार आहे. ऑटोमेटेडड वेअरहाऊस ते माहितीआधारित निर्णय या माध्यमातून रोजचं कामकामज अधिक सुरळीत करणं आणि त्याजोगे ग्राहकांचं समाधान करणं ही उद्दिष्टं फ्लिपकार्टने डोळ्यासमोर ठेवली आहेत.
फ्लिपकार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष, सप्लाय चेन, कस्टमर एक्सपिरियन्स, रिकॉमर्स विभागाचे प्रमुख हेमंत बद्री म्हणाले, “TBBD हा फ्लिपकार्टचा फक्त फ्लॅगशिप इव्हेंट नाही, तर त्या निमित्ताने सणासुदीच्या दिवसात सर्व घटकांना एकत्र आणण्याचा उत्सव आहे. सप्लाय चेन नेटवर्कच्या विस्तारामुळे आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकू आणि त्यांना शॉपिंगचा उत्तम अनुभव मिळेल. आमच्या सक्षम, शाश्वत अशा सप्लाय चेन नेटवर्कमुळे ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतीलच पण योग्य संधीच्या द्वारे आर्थिक विकास होईल. आम्ही सेवा देत असलेल्या समुदायावरही त्याचा दूरगामी परिणाम होईल. किराणा पार्टनर्सला यामुळे प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. सणासुदीच्या काळात संपूर्ण भारतात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आमचे कर्मचारी आमच्या सप्लाय चेन नेटवर्कचा कणा आहेत. या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवतोय आणि याचा आम्हाला गर्व आहे. डिलिव्हरीचा वेग, कार्यक्षमता वाढवून भारताततील इकॉमर्स क्षेत्रात क्रांती आणायची हे आमचं उद्दिष्ट आहे.”
फ्लिपकार्टची डिलिव्हरची क्षमता वाढवण्यासाठी सप्लाय चेनचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे द बिग बिलियन डेज २०२४ दरम्यान विश्वासार्ह आणि अधिक वेगाने डिलिव्हरीज होतील. तसंच सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर नवीन कामगारांसाठी प्रशिक्षणाचेही नियोजन करण्यात आलं आहे. जेणेकरून ते वाढत्या मागणीला न्याय देऊ शकतील. फ्लिपकार्टने सर्वसमावेशकता आणि विविधतेला कायमच प्राधान्य दिलं आहे. त्याचाच भाग म्हणून नवीन कर्मचाऱ्यांममध्ये स्त्रियांचा, तसंच दिव्यांग आणि एलजीबीटीक्यू+ वर्गातील लोकांचा मोठ्या संख्येने समावेश केला जाणा
र आहे.


