Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedएसपीजेआयएमआरला सलग दुसऱ्या वर्षी फायनान्शियल टाइम्‍स मास्‍टर्स इन मॅनेजमेंट ग्‍लोबल रँकिंगमध्‍ये भारतातील...

एसपीजेआयएमआरला सलग दुसऱ्या वर्षी फायनान्शियल टाइम्‍स मास्‍टर्स इन मॅनेजमेंट ग्‍लोबल रँकिंगमध्‍ये भारतातील टॉप बिझनेस स्‍कूलचा दर्जा मिळाला जागतिक स्‍तरावर ‘करिअर्स सर्विस’ श्रेणीमध्‍ये सातवा क्रमांक

 

मुंबई, सप्‍टेंबर ९, २०२४: भारतीय विद्या भवनच्‍या एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एसपीजेआयएमआर)ला २०२४ साठी फायनान्शियल टाइम्‍स मास्‍टर्स इन मॅनेजमेंट (एफटी एमआयएम) ग्‍लोबल रँकिंगमध्‍ये भारतातील पहिल्‍या क्रमांकाचे आणि जागतिक स्‍तरावर ३५व्‍या क्रमांकाचे बिझनेस स्‍कूल म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

सलग पाचव्‍या वर्षी हे यश संपादित करण्‍यात आले आहे, जेथे एसपीजेआयएमआरला जगातील टॉप ५० बिझनेस स्‍कूल्‍समध्‍ये स्‍थान मिळाले आहे, तसेच सलग दुसऱ्या वर्षी भारतातील अव्‍वल क्रमांकाचे स्‍कूल म्‍हणून सन्‍मान मिळाला आहे. एसपीजेआयएमआर जागतिक स्‍तरावरील टॉप ५० बिझनेस स्‍कूल्‍समध्‍ये सामील असलेल्‍या फक्‍त तीन भारतीय संस्‍थांपैकी एक आहे. एसपीजेआयएमआरने ३९व्‍या व ४१व्‍या स्‍थानावर असलेल्‍या अनुक्रमे आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम बेंगळुरूला मागे टाकत आपल्‍या दोन-वर्ष पूर्ण-वेळ पोस्‍ट ग्रॅज्‍युएट डिप्‍लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम)साठी जागतिक स्‍तरावर ३५वे स्‍थान सुनिश्चित केले.

फायनान्शियल टाइम्‍स मास्‍टर्स इन मॅनेजमेंट २०२४ रँकिंगमध्‍ये भारतातील टॉप बिझनेस स्‍कूल म्‍हणून मान्‍यता मिळण्‍याबाबत एसपीजेआयएमआरचे डीन डॉ. वरूण नागराज म्‍हणाले, “या सन्‍मानामधून ‘वाइज इनोव्‍हेशन’ला प्रगत करत व्‍यवसाय आणि समाजावर सकारात्‍मक प्रभाव निर्माण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. जगातील टॉप ५० बिझनेस स्‍कूल्‍समधील आमच्‍या सातत्‍यपूर्ण कामगिरीमधून आमची फॅकल्‍टी व व्‍यावसायिक कर्मचाऱ्यांची समर्पितता, आमच्‍या माजी विद्यार्थ्‍यांची यशस्‍वी कामगिरी आणि आम्‍ही राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर उद्योग, सामाजिक क्षेत्र व शैक्षणिक संस्‍थांसोबत केलेले सहयोग निदर्शनास येतात. हा सन्‍मान आम्‍हाला सर्वोत्तमतेच्‍या मर्यादांना दूर करण्‍यास प्रेरित करतो, ज्‍यामधून आमचे पदवीधर सर्वोत्तम विश्‍वाला आकार देण्‍यासाठी उत्तमरित्‍या सुसज्‍ज असण्‍याची खात्री मिळते.”

एफटी मास्‍टर्स इन मॅनेजमेंट २०२४ रँकिंग एसपीजेआयएमआर व्‍यतिरिक्‍त १३ भारतीय संस्‍थांना सन्‍मानित करते, ज्‍यामधून भारतीय बी-स्‍कूल्‍सची वाढती जागतिक मान्‍यता दिसून येते.

एफटी एमआयएम रँकिंग एएसीएसबी किंवा इक्‍यूयूआयएसद्वारे मान्‍यताकृत, मर्यादित किंवा कामाचा कोणताही अनुभव नसलेल्‍या सहभागींसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या स्‍कूल्‍समधील प्रोग्राम्‍सचे मूल्‍यांकन करते. हे रँकिंग विशिष्‍ट निकषांवर आधारित आहे, जसे ‘अॅल्‍युम्‍नी करिअर प्रोग्रेस’, जे प्रोग्राम पूर्ण झाल्‍यानंतर माजी विद्यार्थ्‍यांच्‍या यशावर लक्ष केंद्रित करते, ‘स्‍कूल डायव्‍हर्सिटी’, जे संस्‍थेमधील सर्वसमावेशकता व वैविध्‍यतेचे मूल्‍यांकन करते, ‘इंटरनॅशनल एक्‍स्‍पेरिअन्‍स अँड रिसर्च’, जे जागतिक एक्‍स्‍पोजर व संशोधन योगदानांना दाखवते आणि ‘करिअर सर्विसेस्’.

उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे, एसपीजेआयएमआरने जागतिक रँकिंगमधील ‘करिअर सर्विस’ श्रेणीमध्‍ये प्रतिष्ठित सातवे स्‍थान संपादित केले, ज्‍यामधून विद्यार्थी प्‍लेसमेंट्सला साह्य करण्‍यामध्‍ये आणि पदवीधरांना अपवादात्‍मक करिअर संधी देण्‍यामध्‍ये त्‍यांची सर्वोत्तमता दिसून येते.

एसपीजेआयएमआर बाबत

भारतीय विद्या भवनची एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एसपीजेआयएमआर) ही एक आघाडीची पदव्युत्तर व्यवस्थापन संस्था असून तिला फायनान्शियल टाइम्सच्या एमआयएन ग्लोबल रँकिंगकडून भारताची पहिल्या क्रमांकाची बिझनेस स्कूल म्हणून, बिझनेस टुडेकडून देशातील पहिल्या पाच बिझनेस स्कूल्सपैकी एक म्हणून तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट रेटिंग या स्विस संस्थेकडून सामाजिक प्रभावासंदर्भात जगभरातील पहिल्या पाच बिझनेस स्कूल्सपैकी एक म्हणून मान्यता मिळाली आहे. एसपीजेआयएमआर मॅनेजमेंट अभ्यासाबाबत आपल्या नावीन्यपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या सुसंगत दृष्टीकोनाद्वारे आपल्या विद्यार्थी, माजी विद्यार्थी, संस्था तसेच तिचे लीडर्स आणि समाज यांच्यामध्ये मूल्याधारित वाढीसाठी प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे.

अधिक माहितीसाठी येथे भेट द्या https://www.spjimr

.org/.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments