पुणे : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचे ३६ व्या पुणे फेस्टिवल मध्ये ‘अविष्कार भारती’ हा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय गायन, गझल, नाट्य संगीत, भरतनाट्यम कथक, सत्रिय या कलाकृतींचा एकत्रित कलाविष्कार बघण्याची पर्वणी पुणेकरांना यावेळी मिळेल, अशी माहिती भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक डॉ. शारंगधर साठे यांनी दिली.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रो.डॉ. शिवाजीराव कदम यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमात असणार आहे. गुरु पंडिता रोहिणी भाटे, पंडिता मनीषा साठे, डॉ. सुचेता चापेकर,पंडिता शमा भाटे, डॉ. स्वाती दैठणकर अरुंधती पटवर्धन व डॉ देविका बोरठाकूर या ज्येष्ठ गुरूंच्या शिष्या जे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे विद्यार्थी आहेत ते कार्यक्रमात सादरीकरण करणार आहेत.
अभंग, गण गवळण, नाट्यसंगीत, गझल, भावगीत, मराठी हिंदी सिनेसंगीताचे सादरीकरण सुरंजन व शुभम खंडाळकर आणि नंदिनी व अंजली गायकवाड करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन स्वरदा कुलकर्णी करणार आहे
त.


