गुरूग्राम, भारत – सप्टेंबर १२, २०२४ – सॅमसंग या भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने त्यांचा प्रमुख गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रा स्मार्टफोनवर अभूतपूर्व किमतीची घोषणा केली आहे.
१२ सप्टेंबर २०२४ पासून गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रा लिमिटेड पीरियड ऑफरचा भाग म्हणून फक्त १,०९,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची मूळ किंमत १,२९,९९९ रूपये होती. स्पेशल किमतीमध्ये ८,००० रूपयांची त्वरित कॅशबॅक, तसेच १२,००० रूपयांच्या अतिरिक्त अपग्रेड बोनसचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक १२,००० रूपयांच्या बँक कॅशबॅकचा देखील आनंद घेऊ शकतात. तसेच, अधिक परवडणाऱ्या स्मार्टफोनचा शोध घेत असलेले ग्राहक २४ महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयचा फायदा घेऊ शकतात.
गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रा मोबाइल एआयच्या नवीन युगामध्ये प्रवेश करत आहे, ज्यामुळे ग्राहक गॅलॅक्सी एआयसह अधिक टास्क्स करू शकतात.
गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रा नेटिव्ह अॅपमध्ये फोन्स कॉल्सचे द्विमार्गी, रिअल-टाइम वॉईस व टेक्स्ट भाषांतर देणाऱ्या लाइव्ह ट्रान्सलेटसह फोनची सर्वात मुलभूत भूमिका म्हणजेच संवाद वाढवण्यासोबत नव्या उंचीवर नेते. इंटरप्रीटरसह लाइव्ह संवाद त्वरित स्प्लिट-स्क्रिन व्ह्यूवर भाषांतरित केले जाऊ शकतात. हे मेसेजेस् आणि इतर अॅप्ससाठी सेल्युलर डेटा किंवा वाय-फायशिवाय देखील कार्य करते. तसेच, चॅट असिस्ट संवादादरम्यान आवाज स्पष्टपणे ऐकू येण्याच्या खात्रीसाठी परिपूर्ण संवादीय टोन्स मिळण्यास मदत करू शकते. सॅमसंग कीबोर्डमध्ये निर्माण करण्यात आलेले एआय देखील रिअल-टाइममध्ये हिंदीसह १३ भाषांमध्ये मेसेजेस् भाषांतरित करू शकते.
सॅमसंग नोट्समधील नोट असिस्टसह वापरकर्त्यांना एआय-जनरेटेड समरीज मिळतात आणि नोट्सना प्री-मेड फॉर्मेट्समध्ये समाविष्ट करणारे टेम्प्लेट्स तयार करता येतात. अनेक स्पीकर्स असताना देखील वॉईस रेकॉर्डिंग्ससाठी ट्रान्स्क्रिप्ट असिस्ट रेकॉर्डिंगला थोडक्यात सांगण्यासाठी आणि भाषांतरित करण्यासाठी एआय व स्पीच-टू-टेक्स्ट तंत्रज्ञानाचा वापर करते. गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रामध्ये गुगलसह ‘सर्कल टू सर्च’ वैशिष्ट्य देखील आहे.
गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रामध्ये प्रोव्हिज्युअल इंजिन हे एआय-समर्थित टूल्सचे सर्वसमावेशक सूट आहे, जे फोटो कॅप्चर करण्याच्या क्षमतेमध्ये परिवर्तन करते आणि सर्जनशीलता वाढवते. गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रामधील क्वॉड टेलि सिस्टम नवीन ५x ऑप्टिकल झूम लेन्ससह येते, जी ५० मेगापिक्सल सेन्सरसोबत काम करते आणि २x, ३x, ५x ते १०x पर्यंतच्या झूम लेव्हल्समध्ये ऑप्टिकल-क्वॉलिटी परफॉर्मन्सची खात्री देते. याचे श्रेय अॅडप्टिव्ह पिक्सल सेन्सरला जाते. सुधारित डिजिटल झूमसह फोटो १००x मध्ये अत्यंत सुस्पष्ट दिसतात. अपग्रेडेड नाइटोग्राफी क्षमतांसह गॅलॅक्सी एस२४ अट्राच्या स्पेस झूमवर कॅप्चर करण्यात आलेले फोटो व व्हिडिओ कोणत्याही स्थितींमध्ये, तसेच झूम केल्यानंतर देखील आकर्षक व सुस्पष्ट दिसतात. गॅलॅक्सी एस२४ अल्ट्राचा मोठा पिक्सल आकार आता १.४ μm असून ६० टक्के मोठा आहे, ज्यामुळे अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्टपणे फोटो कॅप्चर करता येतात.
गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रामध्ये ६.८ इंच फ्लॅट डिस्प्ले आहे, जो व्युइंगसह उत्पादकतेसाठी सानुकूल करण्यात आला आहे. गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रामध्ये गॅलॅक्सीसाठी स्नॅपड्रॅगन® ८ जेन ३ मोबाइल प्लॅटफॉर्म आहे, जो अविश्वसनीय कार्यक्षम एआय प्रोसेसिंगकरिता उल्लेखनीय सुधारित एनपीयू देतो. गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रामध्ये २६०० नीट्स सर्वोच्च ब्राइटनेस आहे.
गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रामधील कॉर्निंग® गोरिला® आर्मर उच्च दर्जाच्या टिकाऊपणासाठी ऑप्टिकली सुधारण्यात आले आहे. ते विविध प्रकाश स्थितींमध्ये जवळपास ७५ टक्क्यांमध्ये कमी रिफ्लेक्शन देते, ज्यामधून सुलभ, आरामदायी व्युइंग अनुभवाची खात्री मिळते. टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम व्हायोलेट, टायटॅनियम ब्लॅक आणि टायटॅनियम यलो या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेला गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रा टायटॅनियम फ्रेम असलेला पहिला गॅलॅक्सी फोन आहे, ज्यामुळे डिवाईसच्या दीर्घकाळ टिकाऊपणामध्ये अधिक वाढ होते. गॅलॅक्सी एस२४ अल्ट्राची अत्यंत सडपातळ रचना अधिक आरामदायी ग्रिपसह चालता-फिरता उत्तम अनुभवाची खात्री देते.
गॅलॅक्सी एस२४ अल्ट्राने उत्पादन लाइफसायकल वाढवण्याप्रती सॅमसंगची कटिबद्धता कायम ठेवली आहे, जेथे ओएस अपग्रेड्सचे सात जनरेशन्स आणि सात वर्ष सिक्युरिटी अपडेट्स ऑफर करण्यात आले आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना दीर्घकाळापर्यंत त्यांच्या गॅलॅक्सी डिवाईसेसच्या सानुकूल कार्यक्षमतेचा अनुभव घेता येईल. गॅलॅक्सी एस२४ अल्ट्राला सॅमसंग नॉक्सचे संरक्षण आहे, जे एण्ड-टू-एण्ड सिक्युअर हार्डवेअर, रिअल-टाइम थ्रेट डिटेक्शन आणि सहयोगात्मक प्रोटेक्शनच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहितीचे संरक्षण करण्यासोबत असुरक्षिततेपासून संरक्षण देते.
गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रा सर्व आघाडीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्
ये उपलब्ध आहे.


