*ठाणे दि.13(जिमाका) :* सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे, लोकशाही दिनाचे औचित्य साधून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालाच्या अधिपत्याखालील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे द्वारे “संविधान मंदिर लोकार्पण” सोहळा (आभासी पद्धतीने) दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता उपराष्ट्रपती श्री.जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न होणार आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन पध्दतीने एकाच वेळी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे (वागळे इस्टेट) येथील कार्यक्रमास लोकसभा खासदार ठाणे नरेश म्हस्के यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
याप्रसंगी आजी-माजी विद्यार्थी, पालक व संविधानाची जाण असणारे समाजसेवक व स्थानिक नागरिक यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्य श्रीमती स्मिता माने यांनी केले आहे.
00000000000
उपराष्ट्रपती श्री.जगदीप धनखड यांच्या हस्ते संपन्न होणार* *“संविधान मंदिर लोकार्पण” सोहळा*
RELATED ARTICLES


