Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorized67व्या शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत इशिका खंडेलवाल, रिया कासार, छवी पांचाळ, अनायरा...

67व्या शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत इशिका खंडेलवाल, रिया कासार, छवी पांचाळ, अनायरा मेहता यांची आगेकूच सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्पर्धेचे शानदार उदघाटन

पुणे, दि. 10 जानेवारी 2024 – महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी यांच्या वतीने आयोजित व इंडियन ऑईल यांनी प्रायोजित केलेल्या 67 व्या शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत मुलींच्या गटात इशिका खंडेलवाल, रिया कासार, छवी पांचाळ, अनायरा मेहता यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

 

उंड्री येथील संपूर्णपणे काचेच्या महाराष्ट्र स्क्वॉश अकादमीच्या कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 17वर्षांखालील मुलींच्या गटात पहिल्या फेरीत मध्यप्रदेशच्या इशिका खंडेलवालने छत्तीसगडच्या हेमल झुनझुनवालाचा 11-02, 11-00 असा तर, सीबीएससी बोर्ड महाराष्ट्राच्या रिया कासार हिने गुजरातच्या हीर पाडालियाचा 12-10, 11-04 असा पराभव केला. सीबीएससी च्या ऋत्विका बुंदेलाने गुजरातच्या अन्या नागपालचा 11-01, 11-00 असा सहज पराभव केला.

 

14वर्षांखालील मुलींच्या गटात पहिल्या फेरीत आयबीएसएसओच्या छवी पांचालने मध्यप्रदेशच्या खुशी सक्सेनाचे आव्हान 11-06, 11-00 असे मोडीत काढले. चुरशीच्या लढतीत अनायरा मेहताने मध्यप्रदेशच्या शुभी गुप्ताचा 07-11, 16-14, 12-10 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

 

स्पर्धेचे उदघाटन आयओसीएलच्या रिटेल सेल्स(पश्चिम दक्षिण)चे कार्यकारी संचालक नीरज अहलूवालीया, महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष प्रदीर खांडरे, विभागीय क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमओएचे सहसचिव दयानंद कुमार, पुणे जिल्हा स्क्वॉश संघटनेचे सचिव आनंद लाहोटी, इंडीयन ऑईलचे मयंक गुप्ता, कालिदास मगर, शिवाजी कोळी, सतीश पोतदार, नकुल चव्हाण, संदीप पारेख, सुरेंद्र करवा व हृषिकेश बजाज आदी मान्यवर उपस्थित होते.

 

याप्रसंगी स्टलिंऀग स्कूलच्या 5 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी मिले सुर मेरा तुम्हारा, शिव तांडव नृत्य, राजस्थानी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

 

निकाल: 14 वर्षांखालील मुले: दुसरी फेरी:

आकाश फिरोदा (मध्यप्रदेश) वि.वि.मारी सेलवन (विद्याभारती) 11-00, 11-00;

सूर्यनाह एम.(छत्तीसगढ) वि.वि.पी नोएल यिनेंट (तेलंगणा) 11-08, 11-05;

दिविक के(झारखंड)वि.वि.धनविन श्रॉफ(आयबीएसएसओ) 12-10, 11-07;

लोकश (तामिळनाडू)वि.वि.निल गुप्ता (दिल्ली) 11-04, 11-06;

स्वरित पाटील (सीबीएससी)वि.वि.एन कृष्णा कार्तिक(आंध्रप्रदेश) 11-03, 11-01;

सूर्यांश मिश्रा (चंदीगड)वि.वि.सुतियान हुबळी (गोवा) 11-04, 11-05;

कियान कानडे (गुजरात)वि.वि.अर्चन बैलुंग (आसाम) 11-04, 11-07;

इंद्रसिंग बडगुजर (महा)वि.वि.युक्त सजू (आयपीएससी) 11-04, 11-07;

 

14वर्षांखालील मुली: पहिली फेरी:

अनायरा मेहता (आयबीएसएसओ)वि.वि.शुभी गुप्ता (मध्यप्रदेश) 07-11, 16-14, 12-10;

त्रिशा देसाई (गुजरत)वि.वि.अंशिका साहू (छत्तीसगड) 11-02, 11-06;

प्रकैती चंद्राकर (छत्तीसगड) वि.वि.मान्या सावलिया (गुजरात) 11-04, 11-04;

यादवी लटिया (गुजरात)वि.वि.योगिता ठाकर (छत्तीसगड) 11-07, 11-07;

छवी पांचाल(आयबीएसएसओ)वि.वि.खुशी सक्सेना(मध्यप्रदेश) 11-06, 11-00;

 

17वर्षांखालील मुले: पहिली फेरी:

इजाज मोहम्मद (तामिळनाडू)वि.वि.यश सोनवानी (छत्तीसगड) 11-01, 11-05;

अर्सलान एस.(छत्तीसगड)वि.वि.हर्षिल बी.(आसाम) 11-02, 11-02;

यश सोनवंत (छत्तीसगड)वि.वि.कृतार्थ के (आसाम) 11-05, 10-12, 11-03;

लक्ष्मण हरी(तामिळनाडू)वि.वि.अभिनव के (चंदीगड) 11-07, 11-07;

 

17वर्षांखालील मुली: पहिली फेरी:

ऋत्विका बुंदेला(सीबीएससी) वि.वि.अन्या नागपाल(गुजरात) 11-01, 11-00;

रिया कासार (सीबीएससी)वि.वि.हीर पाडालिया (गुजरात) 12-10, 11-04;

इशिका खंडेलवाल (मध्यप्रदेश)वि.वि.हेमल झुनझुनवाला (छत्तीसगड) 11-02, 11-00;

कात्यायनी सकवत (मध्यप्रदेश)वि.वि.पा

  1. वनी साहू (छत्तीसगड) 11-07, 11-04;

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments