मेडी असिस्ट हेल्थकेयर सर्व्हिसेस लिमिटेडचा प्राईस बँड प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेयरसाठी ३९७ ते ४१८ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
· बोली/ऑफर सोमवार १५ जानेवारी २०२४ रोजी खुली होईल आणि बुधवार १७ जानेवारी २०२४ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी ही ऑफर शुक्रवार १२ जानेवारी २०२४ रोजी खुली होईल.
· कमीत कमी ३५ इक्विटी शेयर्ससाठी आणि त्यापेक्षा जास्त शेयर्स हवे असल्यास ३५ च्या पटीत इक्विटी शेयर्ससाठी बोली लावता येईल.
मुंबई, १० जानेवारी २०२४: मेडी असिस्ट हेल्थकेयर सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ सोमवार १५ जानेवारी २०२४ रोजी खुला होणार आहे.
अँकर गुंतवणूकदारांना शुक्रवार १२ जानेवारी २०२४ रोजी बोली लावता येईल. पब्लिक सबस्क्रिप्शनसाठी ही ऑफर सोमवार १५ जानेवारी २०२४ रोजी खुली होईल आणि बुधवार १७ जानेवारी २०२४ रोजी बंद होईल.
मेडी असिस्ट हेल्थकेयर सर्व्हिसेस लिमिटेडचा प्राईस बँड प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेयरसाठी ३९७ ते ४१८ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ३५ इक्विटी शेयर्ससाठी आणि त्यापेक्षा जास्त शेयर्स हवे असल्यास ३५ च्या पटीत इक्विटी शेयर्ससाठी बोली लावता येईल.
या ऑफरमध्ये डॉ विक्रम जीत सिंग छटवाल यांच्याकडून २५,३९,०९२ पर्यंत; मेडिमॅटर हेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून १,२४,६८,५९२ पर्यंत (डॉ विक्रम जीत सिंग छटवाल यांच्यासह समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर); बेसेमर हेल्थ कॅपिटल एलएलसीकडून ६६,०६,०८४ पर्यंत (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर ग्रुप); इन्व्हेस्टकॉर्प प्रायव्हेट इक्विटी फंड I कडून ६२,७५,७०६ पर्यंत (विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार); विवेक पंडित यांच्याकडून २६,३८२ पर्यंत; राहुल एम खन्ना यांच्याकडून २२,६१३ पर्यंत; शंकर राव पालपु (पालपु नीना राव यांच्यासह) यांच्याकडून १७,३३७ पर्यंत; प्रमोद मनोहर अहुजा (ज्योती अहुजा यांच्यासह) यांच्याकडून १७,३३७ पर्यंत; केशव संघी (विनिता केशव संघी यांच्यासह) यांच्याकडून १७,३३७ पर्यंत; अमितकुमार गजेंद्रकुमार पटनी (रुची अमितकुमार पटनी यांच्यासह) यांच्याकडून १३,५६८ पर्यंत; अरिहंत पटनी यांच्याकडून १३,५६८ पर्यंत; ज्योती अहुजा (प्रमोद मनोहर अहुजा यांच्यासह) यांच्याकडून ५,२७६ पर्यंत; रंजन सुरजप्रकाश संघी (जयश्री संघी यांच्यासह) यांच्याकडून ५,२७६ पर्यंत इक्विटी शेयर्सच्या विक्रीचा समावेश आहे.
दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत करण्यात आलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियामध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. या ऑफरसाठी बीएसई हे डेसिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज आहे.
ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम ६(१) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ५०% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.
नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे.
नेट ऑफरचा कमीत कमी १५% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार, प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल. नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी ३५% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे.
सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशिलांसाठी कृपया आरएचपीचे पान क्रमांक ३८९ पहा.
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (आधीची एडेलवीज सिक्युरिटीज लिमिटेड), एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे आहेत.


