*नेवासा
*गरजवंत मराठा समाजाच्या वतीने आंदोलन विक्रमवीर मनोज दादा जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे सुरू केलेल्या गरजवंत मराठा समाज आरक्षण मागणी आंदोलनाला संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला असल्याचे पत्र राज्य सरकारला तहसीलदार नेवासा व पोलिसांमार्फत सरकारला नेवासा तहसील कार्यालयाचे तहसीलदार संजय बिराजदार व नेवासा पोलीस स्टेशनच्या ए पी आय चव्हाण मॅडम यांना मराठा मुक्तिसंग्राम दिनापासून मनोज दादा जरांगे यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण जाहीर करून कुणबी प्रमाणपत्र वाटण्यास सुरुवात करावी यासाठी हैदराबादचा व सातारा गॅझेट चा रा आधार घ्यावा अशा आशयाचे व मनोज दादा जरांगे यांच्या उपोषणास शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष तथा संयोजक माननीय विठ्ठल राजे पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना नेवासा तालुका यांच्या वतीने पाठिंबाचे पत्र देताना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ कोतकर व नेवासा तालुका शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी राज्य कार्यकारणी समितीचे प्रदेशाध्यक्ष अंबादास कोरडे पाटील कोरडे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ कोतकर, नगर नाशिक ऊस कांदा उत्पादक आघाडी विभागीय अध्यक्ष जगन्नाथ पाटील कोरडे, उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष दौलतराव गणगे, नेवासा तालुकाध्यक्ष दादासाहेब पाटील नाबदे, जिल्हा संपर्कप्रमुख संदीप गवारे, तालुका संपर्कप्रमुख दिलीप पोटे, शेतकरी कष्टकरी व एनयूबीसी चे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
आंदोलनाला पाठिंबा देताना जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ कोतकर म्हणाले की संघटना राज्य राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून महाराष्ट्र राज्यातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार गरजवंत मराठा समाजाला कुणबी मराठा आर्थिक आरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे , कुणबी मराठा समाजाला राज्य व केंद्र सरकारने तत्काळ आरक्षण द्यावे व मराठा आंदोलक विक्रमवीर मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनापासून थांबवावे कारण राज्य व केंद्र सरकारच्या धडसोड प्रवृत्तीमुळे पाटील यांना सततच्या आंदोलनामुळे तब्येत सतत खराब होत आहे, याचं महाराष्ट्र सरकारला भान असावं म्हणून संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी नेवासा तालुका तहसीलदार व नेवासा तालुका पोलीस अधिकाऱ्यांकडे राज्य व केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख संदीप गवारे पाटील यांनी दिली.


