Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदिशक्ती’ रथातून अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप अखिल मंडई मंडळ गणेशोत्सवाचे १३१...

आदिशक्ती’ रथातून अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप अखिल मंडई मंडळ गणेशोत्सवाचे १३१ वे वर्ष

पुणे : रौद्र रुपातील कालीमातेची १५ फूट उंचीची मूर्ती असलेल्या ‘आदिशक्ती’रथात विराजमान होऊन अखिल मंडई मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक थाटात पार पडली. आकर्षक विद्यूत रोषणाई असलेला भव्य ‘आदिशक्ती रथ’ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. शारदा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यावेळी गर्दी केली होती. यंदा प्रथमच शारदा गणपतीची मूर्ती ६० अंशात फिरत असल्यामुळे दोन्ही बाजूने भाविकांना मूर्तीचे दर्शन घेता आले. गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता निघाली.

 

बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता पांचाळेश्वर घाट येथे श्रीं चे विसर्जन झाले. सकाळी ५.१५ वाजता मिरवणूकीच्या मुख्य रथाचे आगमन बेलबाग चौकात झाले होते.

 

मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष आहे. रथाचा आकार १४ बाय १८ आणि उंची २७ फूट होता. मेट्रोच्या लकडीपूल येथील पूलामुळे रथाची उंची कमी करण्यासाठी हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. कलादिग्दर्शक विशाल ताजनेकर आणि सहकाऱ्यांनी रथ साकारला.

 

मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन त्यामागे गंधर्व बँड तसेच शिवगर्जना आणि शिवमुद्रा वाद्य पथकाचे वादन मिरवणूकीत झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments