Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized2030 पर्यंत जागतिक वस्त्रोद्योग 2.28 ट्रिलियन युएस डॉलर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता : ...

2030 पर्यंत जागतिक वस्त्रोद्योग 2.28 ट्रिलियन युएस डॉलर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता : फिक्की – वझीरचा वस्त्रोद्योगावरील अहवाल * नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी भारतीय वस्त्रोद्योग उदयोन्मुख जागतिक प्रवाह स्वीकारेल : वस्त्रोद्योग मंत्रालय आयुक्त

मुंबई,20 सप्टेंबर 2024 : फिक्की – वझीरने एम्ब्रेसिंग ट्रान्सफॉर्मेशन : सस्टेनेबिलिटी,डिजिटलायझेशन ॲन्ड इनोव्हेशन या नॉलेज अहवालाचे अनावरण केले. फिक्की आणि महाराष्ट्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागातर्फे टॅग 2024 या वस्त्रोद्योगावरील फिक्कीच्या 15 व्या वार्षिक परिषदेमध्ये याचे अनावरण भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आयुक्त रूप राशी यांच्या हस्ते करण्यात आले. हा अहवाल वस्त्रोद्योगाला आकार देणाऱ्या प्रमुख ट्रेंडसवर प्रकाश टाकतो.यामध्ये चीन खेरीज अन्यत्र विस्तार करू पाहणारे खरेदीदार,सिंथेटिक कापडाची वाढती मागणी,खरेदीदारांच्या स्त्रोतांबाबत विकसित होणारी व एकात्मिक धोरणे यांचा समावेश आहे.

 

बदलत्या नियामक परिस्थितीत जागतिक ब्रँडस,शाश्वतता कशी स्वीकारत आहे आणि विविध उपाययोजनांद्वारे शाश्वतता कशी प्राप्त करता येईल याबाबत प्रकाश टाकण्यात आला आहे.हा अहवाल जागतिक स्पर्धात्मकतेसाठी डिजिटलायझेशनच्या प्रभावाबाबत व ऑटोमेशन,रोबोटिक्स,आर्टिफिशियल इंटेलिजन्स,ब्लॉकचेन,थ्रीडी प्रिटिंग आणि व्हर्च्युअल प्रोटोटाईपिंग याबाबत देखील अंतर्दृष्टी प्रदान करतो.

 

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आयुक्त रूप राशी म्हणाल्या की,शाश्वतता,डिजिटलायझेशन आणि अभिनवता याबाबतचे उदयोन्मुख जागतिक प्रवाह केवळ मोठ्या कंपन्याच नव्हे तर एमएसएमई क्लस्टर्सने देखील प्रभावीपणे स्वीकारून वापरात आणावे,हे भारतीय वस्त्रोद्योगाने सुनिश्चित केले पाहिजे.यामुळे भारतातील संपूर्ण वस्त्रोद्योग साखळीला नवीन संधींचा अधिकाधिक फायदा घेता येईल आणि त्याच वेळी मुल्य परतावा वाढवता येईल व गुणवत्तेची हमी अधिक बळकट करता येईल.

 

रूप राशी यांनी एमएसएमई क्लस्टर्सना अधिक समर्थन देण्याचे आवाहन केले. एमएसएमई क्लस्टर्सना राज्य आणि केंद्र सरकार या दोन्हीकडून विशिष्ट योजना उपलब्ध आहेत.मात्र जागरूकतेचा अभाव आहे.स्टार्टअप्सने विविध सरकारी योजनांकडून पाठिंबा मिळवत बाजारपेठांसाठी अधिकधिक अभिनव सोल्युशन्स विकसित करत आपला सहभाग वाढवला पाहिजे.

 

वझीर ॲडव्हायझर्सचे व्यवसाय संचालक संजय अरोरा म्हणाले की,जागतिक तयार कपडे उद्योगाचा खप हा 2023 मध्ये 1.7 ट्रिलियन डॉलर्स असून चक्रवाढ वार्षिक विकास दर 4 टक्के वाढत 2030 पर्यंत 2.3 ट्रिलियन युएस डॉलर्स गाठण्याची अपेक्षा आहे. जागतिक वस्त्रोद्योग आणि कपड्यांचा व्यापार 2010 पासून चक्रवाढ वार्षिक विकास दर 3 टक्क्यांनी वाढत आहे.यामुळे चक्रवाढ वार्षिक विकास दर 5 टक्क्यांनी वाढ दर्शविणाऱ्या भारतासह आशियाई अर्थ व्यवस्थांना मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.एकंदर भारतीय वस्त्रोद्योगाचा आकार आर्थिक वर्ष 2024 मध्ये 172 अब्ज युएस डॉलर्स इतका असून गेल्या दशकात चक्रवाढ वार्षिक विकास दर 6 टक्क्यांनी वाढ होत आहे व आणखी उच्च गतीने वाढण्यासाठी अधिक समर्थनाची गरज आहे,असे त्यांनी सांगितले.

 

या परिषदेत भारताच्या वस्त्रोद्योगाला जागतिक मानकांशी सुसंगत होणे आणि परिवर्तनाबाबत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.याशिवाय शाश्वत उद्योग विकासासाठी व्यवसायाची पुर्नरचना,व्यवसायामध्ये डिजिटलायझेशन आणि अभिनवतेचा समावेश करणे याबाबत देखील मार्गदर्शन करण्या

त आले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments