Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedबास्किन-रॉबिन्ससाठी भारताचे प्रेम वाढतेय, ब्रँडने सुरू केले भारत आणि सार्क प्रदेशातील 1000...

बास्किन-रॉबिन्ससाठी भारताचे प्रेम वाढतेय, ब्रँडने सुरू केले भारत आणि सार्क प्रदेशातील 1000 वे आउटलेट ● 290 हून अधिक शहरांमध्ये उपस्थिती आणि सातत्यपूर्ण दोनअंकी वाढीसह बास्किन-रॉबिन्सने भारत व सार्क प्रदेशात आपली उपस्थिती वाढविणे सुरूच ठेवले आहे.

मुंबई, 17 सप्टेंबर 2024 : बास्किन-रॉबिन्स हा आयकॉनिक अमेरिकन आइस्क्रीम ब्रँड असून, भारत आणि जगातील सर्वात मोठी क्यूएसआर आइस्क्रीम साखळी आहे. या ब्रँडने त्याच्या 1000 च्या भव्य दालनाच्या उद्घाटनाची अभिमानाने घोषणा केली. मुंबईच्या अंधेरी या उपनगरात हे दालन असेल. हा महत्त्वाचा टप्पा भारतीय आणि सार्क प्रदेशातील ग्राहकांना आनंद देणाऱ्या तीन दशकांच्या प्रवासात एक नवीन पर्व दाखवून देतो.

 

 

 

750 चौरस फुटांवर पसरलेले, नवीन अंधेरी आउटलेट हे मुंबईतील बास्किन-रॉबिन्सचे सर्वात मोठे आणि देशातील सर्वात मोठे आउटलेट आहे, जे आपल्या ग्राहकांना प्रीमियम, नावीन्यपूर्ण मिष्टान्न अनुभव देण्याच्या ब्रँडच्या सतत वचनबद्धतेचे प्रतीक आहे. प्रमुख भागधारक, उद्योग नेते आणि ब्रँड निष्ठावंत या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. बास्किन-रॉबिन्सच्या भारत आणि सार्क प्रदेशातील वाढीचा हा उत्सव होता.

 

 

 

1993 मध्ये ग्रॅव्हिस फूड्ससह भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून, भारत आणि सार्क प्रदेशातील बास्किन-रॉबिन्सची मास्टर फ्रँचायझी, बास्किन-रॉबिन्सने सातत्याने भारतीय ग्राहकांच्या अनन्य प्राधान्यांशी जुळवून घेतले आहे, ज्यामुळे ते घराघरात गुणवत्तेचे प्रतिष्ठित नाव बनले आहे. 1000 व्या आउटलेटचे उद्घाटन हे ब्रँडच्या दर्जेदार घटकांचा वापर करण्याच्या आणि विविध प्रकारचे फ्लेवर्स ऑफर करण्याच्या यशस्वी धोरणाचा दाखला आहे, ज्याने मेट्रोपॉलिटन हब, तसेच लोकप्रिय पर्यटक व नॉन-मेट्रो मार्केटसह 290+ शहरांमध्ये त्याचा विस्तार वाढविला आहे आणि बास्किन-रॉबिन्सची सर्वात मोठी जागतिक बाजारपेठ बनविली आहे.

 

 

 

बास्किन-रॉबिन्सचा भारत आणि सार्क देशांतील प्रवास सतत नावीन्यपूर्ण, नवीन फ्लेवर्स आणि फॉरमॅट्स सादर करण्यापासून ते मोठ्या आउटलेट्स, किओस्क आणि आधुनिक व्यापार चॅनेलच्या मिश्रणाद्वारे त्याच्या किरकोळ फुटप्रिंटचा विस्तार करण्यापर्यंत वैशिष्ट्यीकृत आहे. या प्रदेशात आइस्क्रीम केक, आइस्क्रीम पिझ्झा आणि आइस्क्रीम “रॉक्स”—बाइटच्या आकाराचे आइस्क्रीम ट्रीट—सोप्या स्नॅकिंगसाठी ऑफर करणारा हा पहिला ब्रँड होता.

 

स्थानिक बाजार परिस्थिती आणि ग्राहकांच्या पसंतीशी जुळवून घेण्याची ब्रँडची क्षमता त्याच्या यशात महत्त्वाची ठरली आहे, ज्यामुळे तो केवळ भारत आणि सार्क प्रदेशात कार्यरत असलेला आंतरराष्ट्रीय ब्रँड बनला नाही, तर ग्राहक अनुभवाचा अविभाज्य भाग बनला आहे. बास्किन-रॉबिन्सने मिसिसिपी मड, हनी नट क्रंच आणि बव्हेरियन चॉकलेट यांसारखे लोकप्रिय फ्लेवर्स ऑफर केले आहेत व गुलाब जामुन, कॅरामल मिल्ककेक आणि रबडी जलेबी यांसारख्या स्थानिक गोड पदार्थांपासून बनविलेल्या मेनू आयटमही सादर केले आहेत. याशिवाय, अनेक वर्षांपूर्वी ऑनलाइन ऑर्डरिंगचा आक्रमकपणे अवलंब करणारा हा देशातील पहिला आइस्क्रीम व्यवसाय होता आणि त्याच्या ग्राहकांसाठी लॉयल्टी प्रोग्राम असणारा पहिला व्यवसाय होता.

 

“आम्ही या भागात बास्किन-रॉबिन्सच्या 1,000व्या आउटलेटचा शुभारंभ साजरा करण्यासाठी एकत्र आलो असताना, भारत आणि सार्क देशांतील बास्किन-रॉबिन्सची मास्टर फ्रँचायझी असलेल्या ग्रॅव्हिस फूड्समध्ये आमच्यासाठी हा एक रोमांचक दिवस आहे, असे ”ग्रेव्हिस” ग्रुपचे अध्यक्ष गौरव घई यांनी यावेळी मत व्यक्त केले. “हा महत्त्वाचा टप्पा आमची सामाईक मूल्ये, खोलवर रुजलेली वचनबद्धता आणि या बाजारपेठेतील सर्वोत्तम अंमलबजावणी प्रतिबिंबित करतो.”

 

 

 

“आम्ही आमच्या 1000व्या दालनाच्या उद्घाटनाचा हा महत्त्वपूर्ण प्रसंग साजरा करताना खूप आनंदित आहोत,” असे इंस्पायर ब्रँडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, इंटरनॅशनल मायकेल हेली यांनी सांगितले. “आम्ही ग्रॅव्हिस फूड्सचे 30 वर्षांहून अधिक काळ या प्रदेशात इतकी मजबूत फ्रँचायझी असल्याबद्दल आभार मानू इच्छितो आणि ही कामगिरी साध्य केल्याबद्दल त्यांचे, तसेच इंस्पायर आंतरराष्ट्रीय टीमचे अभिनंदन करू इच्छितो. बास्किन-रॉबिन्सचे यश हे भारतीय अभिरूचीला अनुरूप असा उत्तम आणि नावीन्यपूर्ण अनुभव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. क्यूएसआर स्पेसमध्ये लीडर असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि या बाजारपेठेत आमचा ठसा आणखी उमटविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

 

 

 

“जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याच्या दिशेने भारताची चढती वाटचाल सुरू असताना, बास्किन-रॉबिन्स या प्रवासाचा एक भाग होण्यासाठी, अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी, नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि आमच्या उत्पादनांमध्ये व सेवांमध्ये सतत नावीन्यपूर्ण प्रयत्न करून ग्राहकांना आनंद देण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ग्रॅव्हिस फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम सेठ म्हणाले.

 

 

 

 

 

वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, ग्रॅव्हिस समूहाने अलीकडे भारतात बास्किन-रॉबिन्ससाठी नवीन उत्पादन सुविधा स्थापन केली. भारत आणि सार्क प्रदेशातील 1,000वे दालन स्थान महत्त्वाचा टप्पा असून, हा ब्रँड नावीन्यपूर्ण, धोरणात्मक विस्तारामुळे आणि विकसित होत असलेल्या भारतीय बाजारपेठेच्या सखोल माहितीसह आगामी वर्षांमध्ये आणखी मोठ्या वाढीसाठी सज्ज आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments