पुणे,२३ सप्टेंबर २०२४ : ईशान्य फाऊंडेशन तर्फे यलो रिबन एनजीओ फेअरच्या १७ व्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ दरम्यान क्रिएटिसिटी,एक्स्पो हब, तळमजला,येरवडा येथे संपन्न होणार असून ग्राहकांना खरेदीचा अनुभव घेता येणार आहे. वायआरएनएफच्या या 5 दिवसीय महोत्सवामध्ये भारतभरातील स्वयंसेवी संस्था,बचत गट आणि सामाजिक उपक्रमांमधील विणकर,कारागीर व शेतकरी सहभागी होणार असून ३००० हुन अधिक उत्पादने प्रदर्शित करण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहणार आहे.
देशभरातून महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथील प्रदर्शक सहभागी होणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये उपलब्ध उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीमध्ये हातमाग,नैसर्गिक,सेंद्रिय,अपसायकल्ड,पुनर्वापर केलेले व पर्यावरणपूरक अशा वस्तूंचा समावेश आहे.याबराबेरच पारंपरिक विणकाम व हस्तकला तंत्र,सेंद्रिय शेती,ए2 तूप आणि नैसर्गिक व शुध्द मध बनविणे,सजावटीच्या वस्तू,कलाकृती, बॅग्स, साड्या,ड्रेसेस,फॅशन ज्वेलरी,सेंद्रिय गुळ,ड्रायफ्रुटस,फळे,शेतातील ताज्या भाज्या,मिलेटस,मसाले, लोणची,स्नॅक्स इत्यादींचे स्टॉल्स असणार आहेत. तसेच कुकवेअर/सर्व्हवेअरमधून खाण्याचे फायदे याबद्दल अधिक माहिती जाणून घेता येणार आहे.
25,000 चौरस फूट अशा प्रशस्त जागेत विस्तारलेले हे इनडोअर/आऊटडोअर प्रदर्शन सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे.तसेच वैयक्तिक आणि जीवनशैली खरेदी व्यतिरिक्त सण समारंभ, लग्न तसेच कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी आकर्षक भेटवस्तू पर्याय आणि कल्पना अनुभवता येणार आहेत. याबरोबरच 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फर्निचर/फर्निशिंग ब्रँड्स पाहायला मिळणार आहेत.
ईशान्य फाऊंडेशनच्या विश्वस्त पारूल मेहता म्हणाल्या की,क्रिएटिसिटी येथे होणाऱ्या १७ व्या यलो रिबन एनजीओ फेअरची यंदाच्या वर्षीची संकल्पना रेडिसकव्हर,रेझोनेट,रिव्हाइव्ह ही आहे.या उपक्रमाद्वारे सहभागी झालेल्या विविध स्वयंसेवी,शेतकरी संस्थांद्वारे स्वदेशी उत्पादने खरेदी करून आपला देशाचा समृद्ध वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊयात असे आवाहन मेहता यांनी केले.
हळूहळू लुप्त होत चाललेल्या व पारंपारिक कला आणि हस्तकला पद्धती पुनरुज्जीवित करणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे,अपसायकल, पुनर्नवीनीकरण आणि जैव-विघटनशील उत्पादनांसाठी टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल उत्पादन तंत्राचा प्रचार करणे आणि अनेक स्वयंसेवी संस्था ,बचत गट, शेतकरी, सामाजिक उपक्रम, कारागीर आणि विणकर यांना बळ देणे हे ईशान्य फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे.
खरेदीच्या अनुभवाबरोबरच ग्राहकांना पुरण पोळी,थालीपीठ, वांग्याचे भरीत, पिठलं भाकरी,मिलेट रोटी अशा खाद्यपदार्थांचा आनंद प्रदर्शनात घेता येणा
र आहे.


