Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा एआयएने आपल्या युनिट लिंक्ड विमा योजनांसोबत लॉन्च केला निफ्टी अल्फा ५०...

टाटा एआयएने आपल्या युनिट लिंक्ड विमा योजनांसोबत लॉन्च केला निफ्टी अल्फा ५० इंडेक्स फंड

युनिट लिंक्ड विमा योजनांमध्ये गुंतवणूक करून वृद्धीच्या क्षमतांसोबत मिळेल दीर्घकालीन लाईफ कव्हरेज ~

 

हा फंड सर्वात चांगली कामगिरी बजावणाऱ्या शेयर्समध्ये गुंतवणूक करेल, जे निफ्टी अल्फा ५० इंडेक्सचा भाग आहेत.

मार्केट लिंक्ड साधनांमध्ये गुंतवणूक केल्याने मिळणाऱ्या परताव्याव्यतिरिक्त, ग्राहकांना लाईफ कव्हर आणि आरोग्य व वेलनेसचे लाभ देखील मिळतील.

मुंबई, २४ सप्टेंबर २०२४: भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने (टाटा एआयए) आपल्या युनिट लिंक्ड विमा योजनांमार्फत टाटा एआयए निफ्टी अल्फा ५० इंडेक्स फंड लॉन्च केला आहे. ही एक ओपन एंडेड न्यू फंड ऑफरिंग आहे, यामध्ये अल्फा गुंतवणूक धोरण अवलंबिण्यात येईल, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या प्रियजनांना जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाण्याबरोबरीनेच संभावित विकासाचे देखील लाभ त्यांना मिळतील. एनएफओ ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत खुली राहील, एनएफओ कालावधीमध्ये १० रुपये प्रति युनिटच्या एनएव्हीवर युनिट प्रस्तुत केले जातील.

 

हा फंड उच्च कामगिरी बजावणाऱ्या शेयर्सवर म्हणजे निफ्टी अल्फा ५० इंडेक्समध्ये असलेल्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या ५० शेयर्सवर लक्ष केंद्रित करेल.

 

ग्राहकांनी निफ्टी अल्फा इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक का करावी:

 

हा एक मल्टी-कॅप मार्केट-लिंक्ड गुंतवणूक फंड आहे, जो पॉलिसीधारकांना चांगली कामगिरी बजावणाऱ्या शेयर्समध्ये गुंतवणुकीचे लाभ मिळवण्यात सक्षम बनवतो, जे विविध मार्केट कॅप सेगमेंटचा भाग आहेत.

हा फंड एनएसईमधील शेयर्सची कामगिरी रेप्लिकेट करेल आणि उच्च अल्फा उत्पन्न करेल. बेंचमार्कला मात देणाऱ्या शेयर्सवर लक्ष केंद्रित केल्यामुळे हा फंड पॉलिसीधारकांना उत्तम परतावा मिळवण्याच्या संधी प्रदान करेल.

फंड ८०%-१००% गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित योजनांमध्ये आणि ०%-२०% रोख व मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये करेल. हा फंड पॉलिसीधारकांसाठी परतावा आणि जोखीम यांचे एक योग्य संतुलन सुनिश्चित करेल.

 

 

टाटा एआयएचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख गुंतवणूक अधिकारी (सीआयओ) श्री हर्षद पाटील यांनी सांगितले, “पुढील काही दशकांमध्ये भारताची अर्थव्यवस्था अनेक पटींनी वाढत जाईल, भारतीय इक्विटी बाजारपेठेमध्ये संपत्ती निर्माण करण्याच्या महत्त्वाच्या संधी आहेत. परिणामी, व्यवसाय आपली कमाई, उत्पन्न अनेक पटींनी वाढवण्यात आणि पॉलिसीधारकांना सातत्याने परतावा मिळवून देण्यात सक्षम होतील. टाटा एआयए निफ्टी अल्फा ५० इंडेक्स फंडसोबत आमचे पॉलिसीधारक बाजार भांडवलीकरणामध्ये चांगली कामगिरी बजावणाऱ्या शेयर्सवर लक्ष केंद्रित करून बाजारपेठेतील ट्रेंड्स प्रभावीपणे कॅप्चर करू शकतील. अशाप्रकारे आम्ही ग्राहकांना आमच्या गुंतवणुकीशी संबंधित योजनांमधून मिळणाऱ्या जीवन विमा आणि आरोग्य लाभांव्यतिरिक्त दीर्घकालीन परतावा प्रदान करू शकतो. टाटा एआयए निफ्टी अल्फा ५० इंडेक्स फंड आमच्या ग्राहकांना रोमांचक गुंतवणूक संधी आणि चिंतामुक्त जीवन प्रदान करू शकतो.”

 

 

 

टाटा एआयए पॉलिसीधारक कंपनीच्या नवीन युनिट लिंक्ड विमा योजनांमार्फत निफ्टी अल्फा ५० इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात, जो गुंतवणूकदारांमध्ये प्रसिद्ध टाटा एआयए परम रक्षक (पीआर)++ शृंखला आणि टाटा एआयए प्रो-फिट प्लॅन+++ मार्फत उपलब्ध आहे. इक्विटी गुंतवणुकीची दीघकालीन विकास क्षमता प्रदान करण्याबरोबरीनेच या योजना ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय आवश्यक जीवन व आरोग्य विमा कव्हर देऊन सुरक्षित करतात.

 

 

 

टाटा एआयएने अनेक वेळा आपल्या फंडांबरोबरीनेच संबंधित बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी करत एक मजबूत ट्रॅक रेकॉर्ड बनवला आहे. ग्लोबल रेटिंग प्लॅटफॉर्म मॉर्निंगस्टारनुसार, जुलै २०२४ पर्यंत टाटा एआयए लाईफच्या ९५.५५% एयुएमना (ऍसेट अंडर मॅनेजमेंट) ४ किंवा ५ स्टारचे रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग त्यांच्या गुंतवणूक प्रक्रियेची गुणवत्ता दर्शवते, ज्यामुळे सर्व फंड्सची कामगिरी चांगली होण्याला मदत मिळाली आहे. उदाहरणार्थ, मल्टी कॅप फंडने गेल्या पाच वर्षांमध्ये ३१.२३% चा सीएजीआर परतावा दिला आहे, ज्यावेळी बेंचमार्क परतावा २०.१०% होता, आणि सुरुवातीपासून या फंडचा परतावा २३.२४% होता, जेव्हा बेंचमार्क परतावा १४.७९% होता.

 

टाटा एआयए फंड्सची बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी:

 

गेल्या पाच वर्षातील परतावा* (सीएजीआर)

 

टाटा एआयए फंड्स

 

फंड परतावा (%)*

 

बेंचमार्क परतावा (%)*

 

मल्टी कॅप फंड

 

31.23%

 

20.10%

 

टॉप २०० फंड

 

31.25%

 

20.10%

 

इंडिया कंजम्पशन फंड

 

30.54%

 

20.10%

 

*३१ जुलै २०२४ ची आकडेवारी. मागील कामगिरी भविष्यातील कामगिरीची संकेतक नसते.

 

फंड बेंचमार्क: मल्टी कॅप फंड, इंडिया कंजम्पशन फंड, टॉप २०० फंड, एसअँडपी बीएसई २००

 

**सुरुवात होण्याची तारीख: टॉप २०० फंड: १२ जानेवारी २००९, मल्टी कॅप फंड: ५ ऑक्टोबर २०१५, इंडिया कंजम्पशन फंड

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments