Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सकडून नेक्‍सॉनच्‍या लोकप्रियतेमध्‍ये अधिक वाढ करत नेक्‍सॉन आयसीएनजी आणि Nexon.ev ४५...

टाटा मोटर्सकडून नेक्‍सॉनच्‍या लोकप्रियतेमध्‍ये अधिक वाढ करत नेक्‍सॉन आयसीएनजी आणि Nexon.ev ४५ केडब्‍ल्‍यूएच लाँच

मुंबई, सप्‍टेंबर २४, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या कार्स व एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनीने आज नेक्‍सॉन आयसीएनजीच्‍या लाँचची, तसेच Nexon.ev श्रेणीमध्‍ये नवीन ४५ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅकची भर आणि फ्लॅगशिप रेड हॉट #DARK एडिशनच्‍या लाँचची घोषणा केली. यासह भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्‍ही टाटा एसयूव्‍ही ही पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक या ४ विशिष्‍ट पॉवरट्रेन्‍समध्‍ये उपलब्‍ध असणारी भारतातील पहिली व एकमेव वेईकल ठरली आहे.

 

सतत भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्‍ही म्‍हणून दर्जा मिळालेल्‍या नेक्‍सॉनने २०१७ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून ग्राहकांना अद्वितीय मूल्‍य दिले आहे, ज्‍यामध्‍ये स्‍टायलिश एसयूव्‍ही डिझाइनसह सुरक्षितता आणि दर्जात्‍मक वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे. यामुळे उच्‍च दर्जाच्‍या कार्यक्षमतेची खात्री मिळते.

 

नवीन नेक्‍सॉन ऑफरिंग्‍ज लाँच करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ”फक्‍त सात वर्षांमध्‍ये सात लाखांहून अधिक वेईकल्‍सच्‍या विक्रीसह नेक्‍सॉनने भारतातील वाढत्‍या एसयूव्‍ही बाजारपेठेतील ग्राहकांमध्‍ये विशिष्‍ट छाप निर्माण केली आहे. नेक्‍सॉनची लोकप्रियता स्थिर गतीने वाढली आहे, ज्‍याचे श्रेय योग्‍य वेळी करण्‍यात आलेल्‍या नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञान अपग्रेड्सना जाते आणि आजचे नवीन लाँचेस् या वेईकलच्‍या लोकप्रियतेमध्‍ये अधिक भर करतील. हे लाँचेस् टाटा मोटर्सच्‍या यशस्‍वी मल्‍टी पॉवरट्रेन धोरणाला अधिक पुढे घेऊन जातात आणि प्रत्‍येक गरजेसाठी नेक्‍सॉन असल्‍याची खात्री देतात.

 

भारतातील पहिली टर्बोचार्ज्‍ड सीएनजी वेईकल म्‍हणून लाँच करण्‍यात आलेली नेक्‍सॉन आयसीएनजी मूल्‍याचा शोध घेणा-या, पर्यावरणाप्रती जागरूक असणा-या आणि ड्राइव्‍ह दर्जा व अनुभवाबाबत तडजोड न करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल. Nexon.ev मध्‍ये सादर करण्‍यात आलेले ४५ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक ग्राहकांना शहरामध्‍ये विनासायास प्रवासाचा आनंद देईल, तसेच आरामदायीपणा व सोयीसुविधेसह ३५० ते ३७० किमीची जवळपास लांब सी७५ रिअल वर्ल्‍ड रेंज देईल. सर्वांचे लक्ष वेधून घेण्‍याचा प्रयत्‍न करणा-या किंवा प्रीमियमला पसंती देणा-या सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना रेड #DARK एडिशन ड्राइव्‍ह करण्‍याचा अनुभव अधिक रोमांचक वाटेल.”

 

नेक्‍सॉन आयसीएनजी, भारतातील पहिली टर्बोचार्ज्‍ड सीएनजी वेईकल

 

नेक्‍सॉन आयसीएनजीसह रस्‍त्‍यावर भारतातील पहिली टर्बोचार्ज्‍ड सीएनजी पॉवरट्रेन असलेली वेईकल सादर करण्‍यात आली आहे. १.२ लीटर टर्बोचार्ज्‍ड इंजिनची शक्‍ती असलेली ही वेईकल प्रभावी १०० पीएस शक्‍ती आणि १७० एनएम टॉर्क देते, ज्‍यामधून कार्यक्षमतेबाबत‍ कोणतीच तडजोड न होण्‍याची खात्री मिळते. व्‍यावहारिकता वाढवण्‍याच्‍या आपल्‍या कटिबद्धतेशी बांधील राहत नेक्‍सॉन आयसीएनजीमध्‍ये ३२१ लीटरची सेगमेंट-लीडिंग बूट स्‍पेस आहे, जे टाटा मोटर्सच्‍या स्‍वदेशी विकसित केलेल्‍या नाविन्‍यपूर्ण व प्रमाणित ट्विन-सिलिंडर तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून संपादित करण्‍यात आले आहे.

 

तडजोड न करणारी कार्यक्षमता व व्‍यावहारिकतेव्‍यतिरिक्‍त नेक्‍सॉन आयसीएनजीमध्‍ये प्रीमियम व आरामदायी वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे पॅनोरॅमिक सनरूफ, लेदरेट व्‍हेंटिलेटेड सीट्स आणि हार्मन™ची १०.२५ इंच इन्‍फोटेन्‍मेंट स्क्रिन व १०.२५ इंच फुली-डिजिटल इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर. यासारखी वैशिष्‍ट्ये नेक्‍सॉन आयसीएनजीला भारतातील बाजारपेठेमधील सर्वात लक्‍झरीअस सीएनजी एसयूव्‍ही बनवतात. अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह डिझाइन करण्‍यात आलेली ही वेईकल प्रत्‍यक्ष सीएनजी मोडमध्‍ये देखील स्‍टार्ट होते आणि सिंगल ईसीयू पेट्रोल व सीएनजीमध्‍ये ऑटोमॅटिक स्विचिंग सक्षम करते.

 

नेक्‍सॉन सीएनजीने टाटा मोटर्सच्‍या सुरक्षिततेला डीएनएला अधिक पुढे नेले आहे. ही वेईकल प्रमाणित ५-स्‍टार जी-एनसीएपी रेटेड आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात आली आहे. या वेईकलमध्‍ये तिच्‍या सेगमेंटमधील सर्वात प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह इंडस्‍ट्री-लीडिंग तंत्रज्ञान आहेत, जसे लीक डिटेक्‍शन, फायर प्रोटेक्‍शन डिवाईस, थर्मल इन्सिडण्‍ट प्रोटेक्‍शन, रिअर इम्‍पॅक्‍ट प्रोटेक्‍शन आणि इतर विविध सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये, ज्‍यामधून ड्रायव्‍हर्स आणि इतर प्रवाशांसाठी अद्वितीय सुरक्षिततेची खात्री मिळते.

 

नेक्‍सॉन आयसीएनजीची किंमत यादी:

 

 

ऑल इंडिया एक्‍स-शोरूम

 

Nexon.ev ४५ केडब्‍ल्‍यूएच आणि रेड हॉट #DARK बाबत अधिक माहिती

 

भारतातील ईव्‍हींसाठी गेम-चेंजर म्‍हणून आपला दर्जा अधिक उंचावत Nexon.ev आता ४५ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅकसह येते, ज्‍यामुळे १.२सी रेटिंगमध्‍ये जलद चार्जिंग स्‍पीड्स आणि ४८९ किमीच्‍या रेंजची (अर्बन + एक्‍स्‍ट्रा अर्बन), तसेच Tata.ev च्‍या ३५० ते ३७० किमीच्‍या सी७५ रिअल-वर्ल्‍ड रेंची खात्री मिळते. याव्‍यतिरिक्‍त, ही वेईकल समकालीन इंधन वेईकल्‍सच्‍या तुलनेत उच्‍च संपादन खर्च अशा ईव्‍ही अवलंबतेमधील महत्त्वाच्‍या अडथळ्यांचे निराकरण करते. नवीन ४५ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक, Nexon.ev ची रिअल-वर्ल्‍ड रेंज आणि सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह ही वेईकल ग्राहकांना आकर्षक पर्याय देते.

 

Nexon.ev ची अधिक आकर्षक, अधिक मोठी आणि सर्वोत्तम रेड हॉट #DARK एडिशन वेईकलमधील इंटीरिअर व एक्‍स्‍टीरिअरवरील रेड थीम्‍ड इन्‍सर्ट्स, इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम व इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टरसाठी विशेष यूआय व यूएक्‍स, तसेच पॅनोरॅमिक सनरूफ व फ्रंकसह वेईकलचा प्रीमियम व इच्छित दर्जा वाढवते. बहुप्रतिक्षित दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये, जसे Arcade.ev, स्‍मार्ट वेलकम व गुडबाय सीक्‍वेन्‍स, फ्रण्‍ट एलईडी डीआरएलमध्‍ये निर्माण करण्‍यात आलेले चार्जिंग इंडिकेटर, वेईकल टू वेईकल व वेईकल टू लोड तंत्रज्ञान आणि आतील बाजूस फिजिटल कंट्रोल पॅनेलस रेड #DARK एडिशनमध्‍ये ऑफर करण्‍यात आले आहेत.

 

Nexon.ev आणि Nexon.ev रेड #DARK ची किंमत यादी:

 

परसोना

 

क्रिएटिव्‍ह ४५

 

फिअरलेस ४५

 

एम्‍पॉवर्ड ४५

 

एम्‍पॉवर्ड+ ४५

 

एम्‍पॉवर्ड + ४५ रेड #DARK

 

Nexon.ev ४५

 

₹ १३,९९,०००

 

₹ १४,९९,०००

 

₹ १५,९९,०००

 

₹ १

६,९९,०००

 

₹ १७,१९,०००

 

ऑल इंडिया एक्‍स-शोरूम

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments