Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedहाउस ऑफ टायटनमधील स्किनने 24सेव्हन हा नवीन प्रकार लाँच करत फ्रॅग्रन्सच्या दुनियेत...

हाउस ऑफ टायटनमधील स्किनने 24सेव्हन हा नवीन प्रकार लाँच करत फ्रॅग्रन्सच्या दुनियेत प्रवेश केला

बेंगळुरू, भारत, 25 सप्टेंबर – SKINN, टायटनचा प्रसिद्ध भारतीय सुगंध ब्रँडने SKINN 24Seven ही नवीन, पण आवाक्यात असलेली फ्रॅग्रन्स लाइन लाँच केली. ही धोरणात्मक वाटचाल SKINN साठी अत्यंत महत्त्वाची असून, ती एक विस्ताराची मोठी संधी आहे, ज्याचे उद्दिष्ट प्रीमियम सुगंधांची वाढती मागणी परवडणाऱ्या दरात पूर्ण करणे हे आहे. भारतीय सुगंध बाजारपेठेत एक नवीन श्रेणी प्रस्थापित करून आपले रोजचे जगणे सुगंधित करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

 

SKINN 24Seven ने Eau De Parfums ची श्रेणी सादर केली आहे, जी सामान्यांना असामान्य बनविण्यासाठी डिझाइन केलेली आहे. “SKINN 24seven च्या नवीन सुगंधासह सामान्याला खास तर प्रत्येक दिवस अविस्मरणीय बनवा” हे त्यांचे ध्येय आहे. ‘दर तासाला, दररोज उत्कृष्ट सुगंध” स्वीकारण्यास हे ग्राहकांना प्रोत्साहित करते. भारतीय परफ्युम आणि डिओडरंट मार्केटची किंमत अंदाजे INR 10,000 कोटी आहे, त्यात परफ्युम INR 4500 कोटी तर डिओडरंट INR 5500 कोटी एवढे आहे. INR 4500 कोटींपैकी परफ्युम श्रेणीचा संघटित आकार INR 2500 कोटी असेल, जो पुढील 5 वर्षांमध्ये 12-13% च्या CAGR ने वाढण्याची अपेक्षा आहे.

 

भारतीय सुवासिक बाजारपेठेतील एक आघाडीचा ब्रँड असलेले SKINN दीर्घकाळ ‘Mastige’ विभागाचे नेतृत्व करत आहे. जसजशी ग्राहकांची प्राधान्ये बदलत आहेत आणि डिस्पोजेबल उत्पन्न वाढत आहे, तसतसे परवडणाऱ्या किमतीतील दर्जेदार सुगंधाची मागणी वाढते आहे. या मार्केटचा आवाका पाहूनच SKINN 24Seven धोरणात्मकदृष्ट्या विकसित करण्यात आले आहे, जे या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गुणवत्ता, परवडणारी किंमत आणि शैली यांचे परिपूर्ण पॅकेज देते.

 

 

 

टायटन कंपनी लिमिटेडच्या सुगंध आणि ॲक्सेसरीज विभागाचे सीईओ श्री. मनीष गुप्ता म्हणाले, “SKINN 24Seven ग्राहकांना त्यांची जीवनशैली अधिक समृद्ध करण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ऑफर करत आहे. उत्तम सुगंध हा रोजच्या जगण्याचा भाग असावा, यासाठी आम्ही ग्राहकांना उत्तम पर्याय देत आहोत. प्रीमियम गुणवत्ता, किफायतशीर किंमत आणि वैविध्यपूर्ण सुगंधाच्या पर्यायांसह, तसेच गुणवत्तेशी तडजोड न करता तरुण ग्राहकांसाठी प्रीमियम फ्रॅग्रन्स उपलब्ध करून देण्यावर आमचे लक्ष आहे. परवडणाऱ्या दरातील फ्रॅग्रन्ससाठी असलेली वाढती मागणी पाहता, आम्ही संपूर्ण भारत हेच आता आमचे लक्ष्य ठेवले आहे.”

 

 

 

SKINN 24Seven मधील सुगंधी नोट्स विविध प्रकारच्या भावना जागृत करतात. ओशनिक आणि सायट्रस नोट्स, अर्दी आणि वूडी एकॉर्डसह एकत्र केल्यास सहज व साधेपणाची भावना निर्माण होते. फुलांच्या आणि फळांच्या अर्क अंबरसोबत मिसळल्यास आनंद आणि उबदारपणाच्या भावना जागृत होतात. या बाटलीचे अर्गोनॉमिक डिझाइन वापरण्यासाठी सोपे आहे, तर पॅकेजिंग सुगंधाच्या अभिजाततेला पूरक असे आहे. प्रत्येक सुगंध 6-8 तासांपर्यंत टिकून राहण्यासाठी डिझाइन केला आहे, त्यामुळे दिवसभर एक आनंददायी आणि सुगंधी वातावरण निर्माण होते.

 

 

 

श्री. गुप्ता पुढे म्हणाले, “आम्ही केवळ सुगंध विकत नाही, तर आत्मविश्वास आणि स्टाईलही शिकवितो. नावीन्यपूर्णता आणि भारतीय ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजा समजून घेण्यासाठी ही आमची बांधिलकी आहे.”

 

 

 

SKINN 24Seven 1,745 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत दर्जेदार सुगंध देते. फ्रॅग्रन्स क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. SKINN 24Seven स्पष्ट, मूड-आधारित निवड ऑफर करून वेगळे आहे. आमच्या सर्व मल्टी-ब्रँड स्टोअर्समध्ये, तसेच अग्रगण्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म skinn.in येथे नवीन संग्रह पाहू शकता. SKINN 24Seven सह दररोज, प्रत्येक तासाला उत्कृष्ट सुगंधा.ची जादू अनुभवा.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments