गुरुग्राम, ०४ सप्टेंबर २०२४ – व्हिस्तारा आपल्या विकासगाथेचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज असून कंपनीचे एयर इंडियामध्ये विलिनीकरण होत आहे. १२ नोव्हेंबर २०२४ नंतर व्हिस्तारा फ्लाइटचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना एयर इंडियाच्या वेबसाइटकडे वळवले जात आहे. मात्र, काही ग्राहकांनी या स्थित्यंतराच्या तारखेनंतरचे व्हिस्तारा फ्लाइट यापूर्वीच बुक केले असण्याची शक्यता आहे. त्यांना काही सोप्या पण महत्त्वाच्या स्टेप्सच्या मदतीने आपला प्रवास प्रभावी तसेच ताणमुक्त पद्धतीने करता येईल.
1. बुकिंगचे तपशील पडताळून पाहा
विलिनीकरणानंतर १२ नोव्हेंबरनंतरच्या व्हिस्ताराच्या सर्व विमानसेवा एयर इंडियातर्फे हाताळल्या जातील. त्यामुळे काही बदल आहेत का हे जाणून घेण्यासाठी बुकिंग स्टेटस पाहाणे आवश्यक आहे. ग्राहकंना त्यांचे बुकिंग Air India website किंवा मोबाइल अपवर पीएनआर क्रमांक आणि शेवटचे नाव टाकून पाहाता येणार आहे. यामुळे त्यांना त्यांचे फ्लाइट स्टेटस आणि कोणतेही वेळापत्रक किंवा एयरक्राफ्ट अडजस्टमेंटबदद्ल माहिती कळवली जाईल. प्रवासाच्या दिवशी ग्राहकांना विमानतळावर एयर इंडिया काउंटरवर चेक इन करता येईल.
शेवटचे म्हणजे, ट्रॅव्हल एजंटद्वारे करण्यात आलेल्या बुकिंगसाठी ग्राहकांना एयर इंडिया कॉल सेंटरशी संपर्क करता येईल किंवा एयर इंडिया वेबसाइट किंवा मोबाइल अपद्वारे बुकिंग हाताळता येईल.
2. पीएनआर आणि ई- तिकिटातील बदल
स्थित्यंरानंतर सर्व पीएनआर तेच राहातील, मात्र व्हिस्ताराच्या मूळ तिकिटाऐवदी एयर इंडियाद्वारे नवीन तिकीट वितरित केले जाईल. नव्या तिकिटाचा ई- तिकीट नंबर वेगळा असेल. ग्राहकांनी या नव्या आणि जुन्या अशा दोन्ही तिकिटांची माहिती जपून ठेवणे आणि पर्यायाने प्रवासात कोणतीही गैरसोय होणे टाळता येईल.
3. विमानसेवांविषयी माहिती घ्या
विलिनीकरणानंतर विमानसेवेच्या वेळा समान राहाणार आहेत. मात्र, काही बदल झाल्यास एयर इंडिया ग्राहक सेवा टीम ग्राहकांना ईमेल व एसएमएसद्वारे माहिती कळवेल. दोन्ही एयरलाइन्सच्या टीम स्थित्यंतर सुरळीतपणे पार पाडत ग्राहकांना परिपूर्ण सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
ग्राहकांनी एयर इंडियाच्या वेबसाइटवर फ्लाइटचे स्टेटस तपासावे.
4. बॅगेज अलावन्स, खरेदी आणि लाउंज अक्सेसची पडताळणी करा
ज्या ग्राहकांनी व्हिस्तारा बुकिंगसह अतिरिक्त बॅगेजची खरेदी केली आहे, त्यांची ही सेवा नव्या एयर इंडिया विमानसेवेत (१२ नोव्हेंबर २०२४ नंतर, नियामक संमतीसाठी) हस्तांतरित केली जाईल. ग्राहकांनी विमानतळावर गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बॅगेज खरेदीशी संबंधित कोणत्याही पावत्या किंवा कागदपत्रे जपून ठेवावेत.
व्हिस्तारा बुकिंगवर घेण्यात आलेल्या लाउंज अक्सेस आणि खास/एक्सक्लुसिव्ह सेवा एयर इंडियाद्वारे हाताळल्या जाणाऱ्या फ्लाइटवर वैध नसण्याची (१२ नोव्हेंबर २०२४ नंतरच्या प्रवासासाठी) शक्यता आहे. मात्र, व्हिस्ताराद्वारे अतिरिक्त सेवांचा नियमाप्रमाणे रिफंड दिला जाईल.
5. वेळपत्रकात बदल किंवा रद्द करणे
ग्राहकांना वेळापत्रकात बदल करायचा असल्यास किंवा त्याची फ्लाइट रद्द करायची असल्यास, प्रक्रिया आणि शुल्क कोणत्या विमानकंपनीद्वारे विमानसेवा हाताळली जात आहे, त्यानुसार लागू होईल. ग्राहकांना अधिक मदतीसाठी त्या त्या ग्रा
हक सेवा टीमला संपर्क करता येईल.


