Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र केला आनंदोत्सव शाहीर हिंगे...

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र केला आनंदोत्सव शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व नूमवि प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने आनंदोत्सव साजरा

 

पुणे ः मराठी भाषा हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे. आता केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि नूमवि प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने सरकारच्या या निर्णयाचा गौरव करण्यात आला. यावेळी तब्बल हजार मुलांनी एकत्र येत महाराष्ट्र गीत गात आनंदोत्सव साजरा केला.

 

बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या नेतृत्वाखाली नूमवि शाळेतील तब्बल १००० विद्यार्थीं मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी एकत्रित “महाराष्ट्र गीत” सादर केले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, नियामक मंडळाचे सदस्य सुधीर काळकर, शाला समिती अध्यक्ष पराग ठाकूर, प्रबोधिनीचे अरुणकुमार बाभुळगावकर, अक्षदा इनामदार, मुकुंद कोंडे, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माया सोयाम आदी उपस्थित होते. यावेळी प्रशालेत मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

 

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. याचे महत्व विद्यार्थ्यांनादेखील समजावे यासाठी विद्यार्थ्यांसमवेत आनंदोत्सव साजरा करीत आहोत, असे सांगत विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व देखील त्यांना पटवून दिले.

 

पराग ठाकूर म्हणाले, माझा मराठीची बोलू कौतुके परि अमृतातेही पैजासी जिंके म्हणणारे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीतून आतां विश्वात्मके देवे म्हणून जगासाठी प्रार्थना करतात. ही महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची उंची आहे. त्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments