पुणे,१२ जानेवारी २०२४ : सलाम बॉम्बे फाऊंडेशन (एसबीएफ ) आणि ट्रेंट लिमिटेडच्या सहयोगाने ज्ञानदा प्रशाला या सरकारी अनुदानित शाळेत ‘टेकव्हिजन ‘ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये 9 वीच्या वर्गातील 30 विद्यार्थ्यांनी (गरीब व सरकारी व सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकणारे) 14 स्मार्ट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रदर्शित केले. हे अत्याधुनिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्याच्या उद्देशाने विकसित केले होते. या प्रदर्शनात पेशंट हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम, स्मार्ट शूज, ऑटोमॅटिक प्लांट वॉटरिंग सिस्टीम, फायर फायटिंग रोबोट आणि टेम्परेचर अँड हुमिडिटी कंट्रोल सिस्टीम अशा विविध प्रकल्पांचा समावेश होता. या कार्यक्रमाला एससीईआरटीच्या सहसंचालक डॉ. शोभा खंदारे, पुणे नॉलेज क्लस्टरच्या कार्यक्रम व्यवस्थापक प्राची पासलकर आणि माजी आमदार अशोक मोहोळ आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. 2014 मध्ये स्थापन झालेल्या सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या व्यावसायिक कौशल्य विकास कार्यक्रमाने मुंबई, पुणे, बेंगळुरू, कोलकाता, जयपूर, नाशिक आणि किमोरसह भारतातील अनेक ठिकाणी 35,000 हून अधिक संसाधनांची कमतरता असलेल्या किशोरवयीन मुलांना प्रशिक्षित केले आहे.
सलाम बॉम्बे फाऊंडेशन आणि ट्रेंट लिमिटेड तर्फे ‘टेकव्हिजन’ प्रदर्शनाचे आयोजन
RELATED ARTICLES


