Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedवरिंदरा कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड’तर्फे ‘सेबी’कडे 1200 कोटी रुपयांच्या ‘आयपीओ’साठी डीएचआरपी दाखल

वरिंदरा कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड’तर्फे ‘सेबी’कडे 1200 कोटी रुपयांच्या ‘आयपीओ’साठी डीएचआरपी दाखल

अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) असा एकीकृत व्यवसाय करणाऱ्या ‘वरिंदरा कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड’ला (“द कंपनी”, व्हीसीएल) निवासी घरे, कमर्शियल कॉम्प्लेक्स, ऑफिस, रेल्वे स्थानके, रुग्णालये, उच्च न्यायालय, ग्रंथालय अशा इमारती प्रकल्पांच्या बांधकामाचा सखोल अनुभव आहे. तसेच मेट्रो डेपो, एअरक्राफ्ट हॅन्गर आणि रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांचे प्रकल्पही कंपनीने हाती घेतलेले आहेत. या कंपनीने आपला ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’चा मसुदा (डीएचआरपी) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या बाजार नियामक संस्थेकडे दाखल केला आहे.

कंपनीने 12 हजार दशलक्ष [1200 कोटी] रुपयांच्या प्राथमिक समभाग विक्रीच्या माध्यमातून प्रत्य़ेकी 1 रुपया दर्शनी मूल्य़ असलेले इक्विटी शेअर्स बाजारात सादर करण्याची व निधी उभारण्याची योजना आखली आहे. (“इश्यू साइज”)

या ऑफरमध्ये 9000 दशलक्ष (900 कोटी) रुपयांपर्यंतच्या किंमतीचे ‘फ्रेश इश्शू’मधील इक्विटी शेअर्स, तसेच कंपनीच्या शेअरहोल्डर्सकडील ‘ऑफर फॉर सेल’साठी उपलब्ध असलेले 3000 दशलक्ष [300 कोटी] रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे.

‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’द्वारे ऑफर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या स्टॉक एक्सचेंजेसवर सूचीबद्ध करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. (सूचीचे तपशील)

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर (बीआरएलएम) आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments