सानंद, जानेवारी १२, २०२४: टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. (टीपीईएम) या भारतातील आघाडीची ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोटर्सच्या उपकंपनीने आज सानंद, गुजरात येथील त्यांच्या नवीन फॅक्टरीमध्ये प्रवासी वाहनांच्या उत्पादनाच्या शुभारंभाची घोषणा केली. हा इव्हेण्ट कंपनीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि या जागतिक दर्जाच्या सुविधेमधून पहिली टाटा ब्रॅण्डेड कार सादर करण्यासह साजरा करण्यात आला. यावेळी टीपीईएमचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा आणि पॅसेंजर व इलेक्ट्रिक वेईकल्स व्यवसायांमधील लीडरशीप टीम उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण प्रसंगाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले, ”सानंद येथील नवीन टीपीईएम केंद्रामधून पहिल्या कारचे सादरीकरण पाहणे आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. आम्ही १२ महिन्यांच्या कालावधीत फॅक्टरीमध्ये यशस्वीपणे सुधारणा केल्या आहेत आणि फॅक्टरीला नव्या उंचीवर नेले आहे, जेथे फॅक्टरीमध्ये विद्यमान उत्पादनांची, तसेच आगामी भावी नवीन मॉडेल्सची व्यापक श्रेणी आहे. मी गुजरात सरकारचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि आमच्या कर्मचाऱ्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांच्याशिवाय हे यश शक्य झाले नसते. मला विश्वास आहे की हे केंद्र टाटा मोटर्सला, विशेषत: टीपीईएमला नवीन यश गाठण्याच्या दिशेने साह्य करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.”
ते पुढे म्हणाले, ”टाटा मोटर्स पॅसेंजर व इलेक्ट्रिक वेईकल्स व्यवसायाने गेल्या काही वर्षांमध्ये बाजारपेठेत विक्रमी वाढ नोंदवली आहे. भविष्यासाठी सुसज्ज ‘न्यू फॉरेव्हर’ उत्पादनांची आमची प्रबळ पाइपलाइन आणि इलेक्ट्रिक वेईकल्समधील सक्रिय गुंतवणूकांसह ही गती कायम राखण्यासाठी आमच्या प्रबळ योजना आहेत. विद्यमान क्षमतांसह हे नवीन केंद्र प्रतिवर्ष ३००,००० युनिट्सची अतिरिक्त अत्याधुनिक उत्पादन क्षमता अनलॉक करेल, ज्यामुळे उत्पादन क्षमता प्रतिवर्ष ४२०,००० युनिट्सपर्यंत वाढेल.”
पुरवठादारांचे प्रबळ नेटवर्क उपलब्ध असलेल्या इंडस्ट्रीयल हब, जीआयडीसी सानंद येथे स्थित या नवीन केंद्राला १० जानेवारी २०२३ रोजी फोर्ड इंडियाने संपादित केले. ४६० एकर जागेवर पसरलेले हे आयसीई व ईव्ही मॉडेल्स उत्पादित करणारे गुजरातमधील टाटा मोटर्सचे दुसरे प्लाण्ट आहे. या प्लाण्टमध्ये चार प्रमुख शॉप्स आहेत – स्टॅम्पिंग, बॉडी कन्स्ट्रक्शन, पेंट व फायनल असेम्ब्ली शॉप आणि हे शॉप्स अचूक उत्पादनासाठी उच्च स्तरीय ऑटोमेशन व आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज आहेत. या केंद्राने विविध जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानांचा अवलंब केला आहे, जे उद्योगामधील नवीन बेंचमार्क स्थापित करतील.
प्रमुख रिटूलिंग आणि अपग्रेड्स पुढीलप्रमाणे:
प्रेस शॉप – महत्त्वपूर्ण स्किन पॅनेल्स स्टॅम्पिंग करण्यासाठी नवीन डाय.
वील्ड शॉप – अतिरिक्त रोबोट्स, नवीन ग्रिपर्स आणि फिक्स्चर्ससह सर्व लाइन्समध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
पेंट शॉप – हँडलिंग सिस्टम्स, एक्स्टर्नल रोबोट प्रोग्रामिंग, इंटर्नल रोबोटिक पेंटिंग आणि वॅक्सिंग सेटअपमध्ये सुधारणा.
असेम्ब्ली शॉप – हँडलिंग सिस्टम्स आणि एण्ड ऑफ लाइन सिस्टममध्ये सुधारणा.
प्लाण्टमध्ये सध्या १००० हून कर्मचारी (स्टाफ व टेक्निशियन्ससह) आहेत आणि उत्पादनात वाढ करण्याच्या योजनांमुळे प्रांतामध्ये पुढील ३ ते ४ महिन्यांमध्ये १००० अतिरिक्त रोजगार निर्माण होतील. टाटा मोटर्सने आपल्या कर्मचारीवर्गाला डिप्लोमा, बॅचलर ऑफ इंजीनिअरिंग आणि मास्टर्स डिग्री, जे लागू असेल ते शिक्षण प्रदान करत अपस्किलिंग करण्याप्रती गुंतवणूक केली आहे. टाटा मोटर्सच्या शाश्वततेप्रती कटिबद्धतेशी बांधील राहत प्लाण्टमध्ये ५० केडब्ल्यू सोलार रूफटॉप बसवण्यात आले आहे. हे वॉटर न्यूट्रल प्लाण्ट आहे आणि डिसेंबर २०२४ पर्यंत वॉटर पॉझिटिव्ह असण्याची अपेक्षा आहे.


