Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedडिस्ट्रिक्ट १२५ टोस्टमास्टर्सला सलग दुसऱ्यांदा स्मेडले हे प्रतिष्ठेचे मानांकन

डिस्ट्रिक्ट १२५ टोस्टमास्टर्सला सलग दुसऱ्यांदा स्मेडले हे प्रतिष्ठेचे मानांकन

पुणे, 11 ऑक्टोबर २०२४ : पुणे, छत्रपती संभाजीनगर,अहमदनगर, नाशिक,कोल्हापूर आणि गोवा येथील सदस्य असलेल्या आणि टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल या जागतिक पातळीवरच्या ना नफा तत्वावर कार्यरत असलेल्या, शैक्षणिक संस्थेचा भाग असलेल्या डिस्ट्रिक्ट १२५ ला सलग दुसऱ्यांदा स्मेडले हे प्रतिष्ठेचे मानांकन मिळाले आहे. नेतृत्व आणि संवाद कौशल्याला चालना देण्यासाठी डिस्ट्रिक्ट १२५ ची समर्पितता दर्शविते.

डिस्ट्रिक्ट १२५ मध्ये अनेक क्लब्सचा समावेश असून नियमित बैठका,स्पर्धा आणि शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केल्या जातात,ज्यामुळे सदस्यांना कौशल्य विकासासाठी अनेक संधी उपलब्ध होतात. गेल्या अनेक वर्षात डिस्ट्रिक्ट १२५ ने सांघिक कार्य आणि नेतृत्व विकासासाठी आपले एक स्थान मिळविले आहे. समर्पित सदस्य आणि दूरदर्शी नेतृत्वासह उत्कृष्ठतेच्या परिसीमा ओलांडून प्रत्येक क्लबमध्ये विकासासाठी सदस्यांना प्रेरित करून डिस्ट्रिक्ट १२५ ने स्वतःची एक वेगळी ओळख प्राप्त केली आहे.

स्मेडले हा प्रतिष्ठित सन्मान टोस्टमास्टर्सचे संस्थापक राल्फ सी.स्मेडले यांच्या स्मरणार्थ दिला जातो. हा सन्मान सदस्यवाढ, क्लबचा विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेतील उत्कृष्टता दर्शवितो. सलग २ वर्षे हा सन्मान मिळणे हे डिस्ट्रिक्ट १२५ चे नेतृत्व, सदस्य संवाद आणि उच्च मानके दर्शविते. तसेच वक्तृत्व व नेतृत्व कौशल्य सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या सदस्यांना सहयोगात्मक वातावरण प्रदान करण्याप्रती डिस्ट्रिक्ट १२५ ची कटिबद्धता दर्शविते. या सन्मानामुळे टोस्टमास्टर्सच्या मूळ तत्वांशी सुसंगत राहत डिस्ट्रिक्ट १२५ चा शाश्वत विकास आणि यश दर्शविते. डिस्ट्रिक्ट १२५ मधील नेतृत्व, संचालक मंडळ आणि सदस्यांनी सहयोगात्मक प्रयत्नांद्वारे व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य आणि प्रत्येक स्तरावर उत्कृष्टतेसाठी प्रेरणा देणारे वातावरण निर्माण करून एक समृद्ध समुदाय तयार केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments