Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवीन मराठी शाळेत दसऱ्याच्या निमित्ताने पाटीपूजन व पुस्तक पूजन*

नवीन मराठी शाळेत दसऱ्याच्या निमित्ताने पाटीपूजन व पुस्तक पूजन*

पुणे :शुक्रवार दिनांक ११-१०-२०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत दसऱ्याच्या निमित्ताने पाटीपूजन व पुस्तक पूजन उपक्रम घेण्यात आला.पाटीवर लिखाणाचा सराव केल्याने हस्ताक्षर छान राहते. प्राथमिक शिक्षणात ज्ञान मिळवण्याचे माध्यम म्हणून पाटी उपयोगी येते त्यामुळे आपल्या संस्कृतीत पाटी पूजनाला अतिशय महत्त्व आहे.” असे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सर्व विद्यार्थी या दिवशी नवीन रंगीबेरंगी जांभळ्या रंगाचे कपडे घालून शाळेत आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका कल्पना वाघ ,ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने, धनंजय तळपे यांच्या हस्ते शालेय पाटीचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेत खंडेनवमीनिमित्त संगणक, फळा, पाटी, झेरॉक्स मशीन आणि शाळेतील इतर महत्त्वाच्या साहित्यांचे पूजन करण्यात आले. सरस्वती वंदना म्हणून प्रत्येक वर्गात फळ्याचे व पाटीचे पूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महावाचन चळवळ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या आकारात बसवून त्यांचे वाचन यावेळी घेण्यात आले.शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. स्वाती यादव, मीनल कचरे,प्रतिभा पाखरे,योगिता भावकर यांनी नियोजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments