बंगलोर, १४ ऑक्टोबर २०२४: गेम्स२४X७ या भारतातील सर्वात जास्त युजर-केंद्रित, शास्त्रोक्त आणि अभिनव ऑनलाईन गेमिंग कंपनीने त्यांचा एक्सिलिरेटर प्रोग्राम टेकएक्स्पिडाईटची दुसरी आवृत्ती लॉन्च केल्याची घोषणा आज केली आहे. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये नावीन्याला चालना देण्यासाठी कंपनीने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. एडब्ल्यूएस या क्लाऊड पार्टनरच्या सहयोगाने तयार करण्यात आलेला ६० दिवसांचा एक्सिलिरेटर प्रोग्राम गेमिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्रभावांनुसार चालणारे समावेशक तंत्रज्ञान या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्सना उत्पादन विकास, सेवा आणि संशोधन यांच्यामार्फत सक्षम बनवण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे.
या प्रोग्रामविषयी माहिती देताना कर्नाटक सरकारचे माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे माननीय मंत्री श्री प्रियांक खरगे यांनी सांगितले, “टेकएक्स्पिडाईटसारखे उपक्रम नावीन्याच्या पुढील टप्प्याला वेग प्रदान करण्यात, नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या स्टार्टअप्सना जागतिक पातळीवर अग्रणी स्थान मिळवून देण्यात मदत करण्यात खूप मोलाची भूमिका बजावतात. अनोखे व्हिजन आणि खाजगी क्षेत्रासोबत सहयोग या दोन गोष्टींमुळे कर्नाटक राज्य भारताच्या तंत्रज्ञान व स्टार्टअप इकोसिस्टिमला आघाडी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. भविष्याचा विचार केला तर डिजिटल दरी भरून काढण्यासाठी आणि आर्थिक वृद्धी व सामाजिक कल्याण यासाठी तंत्रज्ञान योगदान देत राहील हे सुनिश्चित करण्यासाठी कर्नाटक सुसज्ज आहे.”
गेम्स२४X७ चे सह-सीईओ आणि सह-संस्थापक श्री भाविन पंड्या म्हणाले, “आम्ही असे मानतो की, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमधील गुंतवणूक लक्षणीय यश मिळवून दिल आणि आमच्या एक्सिलिरेटर प्रोग्रामची दुसरी आवृत्ती आमचा हा विचार अधोरेखित करते. भारताच्या तंत्रज्ञान स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये या क्षमतेला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आम्हाला अभिमान आहे जवळपास दोन दशकांच्या सखोल अनुभवाच्या बळावर आम्ही नव्या युगातील उद्यमींना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि भांडवलापर्यंत पोहोच पुरवून पाठिंबा देण्यासाठी सुयोग्य आहोत. क्रांतिकारी उत्पादने आणि सेवा निर्माण करण्यासाठी नाविन्याचा ध्यास घेऊन काम करत असताना आमचा पाठिंबा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल.”
कर्नाटक सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बीटी आणि एसअँडटी विभागाच्या सचिव डॉ एकरूप कौर म्हणाल्या, “भारतामधील नावीन्यपूर्णतेला कर्नाटक राज्याने चालना द्यावी हे सरकारचे व्हिजन आहे. टेकएक्स्पिडाईटसारखे एक्सिलिरेटर प्रोग्राम राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टिमला इंधन पुरवण्यात कौतुकास्पद भूमिका बजावत आहेत. संधी आणि मार्गदर्शन यामुळे स्टार्टअप्स आणि उद्यमी यांना अनेक लाभ मिळतील, त्यामुळे व्यवहार्य व शाश्वत वृद्धीचा मार्ग खुला होईल.”
टेकएक्स्पिडाईट भारतभरातील विविध राज्यांमध्ये विशेष चॅप्टर्सचे आयोजन करून विविध क्षेत्रांमधील स्टार्टअप्सना त्यामध्ये सहभागी करून घेईल, मार्गदर्शन व नेटवर्किंग संधी उपलब्ध करवून देईल. वेग वाढवण्यासाठी सज्ज असलेल्या १५-२० स्टार्टअप्सच्या समूहाला आलेल्या अर्जांमधून निवडण्यात आले असून त्यांना मेन्टॉरशिप प्रोग्राममध्ये सहभागी करून घेतले जाईल, याठिकाणी ते उद्योगक्षेत्रातील तज्ञांसोबत व्हीसी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधतील, व्यवसाय आणि संचालन वाढवू इच्छिणाऱ्या स्टार्टअप्सना भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी ही सत्रे डिझाईन करण्यात आली आहेत. सहभागी होणाऱ्यांना ३० पेक्षा जास्त क्रेडिट पार्टनर्सकडून जवळपास ५००,००० यूएस डॉलर्सची क्रेडिट्स मिळतील.
गेमिंग, एआय आणि समावेशक तंत्रज्ञान यामध्ये काम करणाऱ्या स्टार्टअप्ससाठी एक्सिलिरेटर प्रोग्राम खुला असेल. पुढे वाढवता येऊ शकेल अशा नावीन्यावर भर देत टेकएक्स्पिडाईटचा उद्देश वर्किंग प्रूफ्स ऑफ कॉन्सेप्ट, यूज-केस ऍप्लिकेशन्स आणि मार्केट-रेडी सोल्युशन्स तयार करण्यासाठी स्टार्टअप्सना सक्षम बनवणे हा आहे. फेब्रुवारी २०२५ मधील पिच इव्हेन्टमध्ये या प्रोग्रामची सांगता होईल, यामध्ये निवडण्यात आलेले स्टार्टअप्स गुंतवणूकदार, उद्योगक्षेत्रातील तज्ञ आणि डोमेन लीडर्सचे पॅनल यांच्यासमोर आपली सोल्युशन्स प्रस्तुत करतील.
या प्रोग्रामसाठी १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.


