Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडसर्च तर्फे अथांग २०२४ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा संपन्न

इंडसर्च तर्फे अथांग २०२४ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा संपन्न

पुणे,17 ऑक्टोबर २०२४ : इंडसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅन्ड रिसर्च तर्फे नुकतेच अथांग २०२४ ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा पार पडली. इंडसर्चच्या लॉ कॉलेज रोड येथील कॅम्पसमध्ये या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिसाद प्रॉडक्शन्सचे भागीदार अनिश जोग यांसह इंडसर्चचे सरसंचालक डॉ.अशोक जोशी, संचालिका डॉ.अपर्णा टेंबुलकर, युजी प्रोग्रॅमच्या डीन व इंटरनॅशनल रिलेशन्सच्या प्रमुख डॉ.सुनिता जोशी आणि युजी समन्वयक निलया मूर्ती आदी मान्यवर उपस्थित होते. अथांग २०२४ मध्ये पुण्यातील २० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होता. यामध्ये बिझनेस प्लॅन,बिझनेस क्विझ,बॉलिवूड क्विझ,मेक अ प्रॉफिट, मॅड ऍड्स, चेस आणि ट्रेझर हंट इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमाचे आयोजन इंडसर्चच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी केले होते.

बिझनेस क्विझ स्पर्धेत श्रावण सोनी,अथर्व कोठारी (एमएमएससीएलसी), बिझनेस प्लॅन मध्ये वैष्णवी नाईकडे,जानवी नाईकडे,गायत्री सोनसरे व मनाली पणशीकर (एचएनआयएमआर), ट्रेझर हंटमध्ये तहसीम रझा,कृष्ण कुमार व राहुल कुमार (लेक्सिकॉन माईल ), बॉलीवूड क्विझमध्ये अथर्व फडणीस,हृषीकेश कुलकर्णी,शुभम हेडावू,श्रेयस बोंजाळ (इंडसर्च बावधन), मेक अ प्रॉफिट स्पर्धेत वागेश बाहेती,श्रावण सोनी,अथर्व लोथारी, अर्णव गद्रे (एमएमएससीएलसी),मॅड ऍड्स मध्ये वागेश बाहेती, प्रणव गायकवाड,सुहानी गुप्ता,प्रिती भोकरे (एमएमएससीएलसी) आणि चेसमध्ये पिनाक जोशी (एच.व्ही देसाई) हे विजेते ठरले.

अथांग २०२४ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments