Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिव्यांग मतदारांना मतदान करण्याबाबत दिली शपथ*

दिव्यांग मतदारांना मतदान करण्याबाबत दिली शपथ*

*

पुणे, दि. 20: कसबापेठ विधानसभा मतदारसंघात स्वीप पथक आणि हिंदू महिला सभा, महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मंडळ येथे दिव्यांग बांधवानी बनविलेल्या विविध उत्पादने व वस्तूंचे दोन दिवसीय प्रदर्शनात मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा भणगे, दिव्यांग कक्षाच्या नोडल अधिकारी पूर्वा जोशी, स्वीप कक्षातील सर्व अधिकारी यांनी दिव्यांग मतदारांना मतदान करण्याबाबत शपथ दिली.

मा. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने दिव्यांग मतदारांकरीता मतदान केंद्रावर असलेल्या सुविधांबाबत माहिती देण्यात आली. तसेच त्यांना सक्षम ॲप वापरण्याबाबतही प्रोत्साहित केले. मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात 250 हून अधिक दिव्यांग मतदार सहभागी होते.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments