Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedखेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात जनजागृती कार्यक्रमाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याचे मतदारांना आवाहन*

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात जनजागृती कार्यक्रमाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याचे मतदारांना आवाहन*

*
पुणे, दि.२२- लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मताधिकार बजवावा, असे आवाहन पथनाट्याच्या माध्यमातून खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात करण्यात आले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्वीप उपक्रम राबविण्यात आला. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता कक्ष तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून मतदार जनजागृती साठी राजगुरुनगर बस स्टॅन्ड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून मतदार जनजागृती विषयावर आधारीत पथनाट्य सादर करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, स्वीप व्यवस्थापक अमोल जंगले, नोडल अधिकारी प्रा. मच्छिंद्र मुळक, डॉ. प्रभाकर जगताप, डॉ. कीर्ती नितनवरे, डॉ. सुनिता जाधव आदी उपस्थित होते.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments