Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्ह्यातील दुर्गम ठिकाणच्या मतदान केंद्रावर दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी संप्रेषण सुविधा कार्यान्वित...

जिल्ह्यातील दुर्गम ठिकाणच्या मतदान केंद्रावर दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी संप्रेषण सुविधा कार्यान्वित करावी-उपजिल्हाधिकारी शमा पवार*

*

पुणे, दि. २४: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी दुर्गम ठिकाणच्या मतदान केंद्रावर संप्रेषण सुविधा कार्यान्वित करून सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दळणवळण आराखड्याच्या समन्वय अधिकारी शमा पवार यांनी केले.

दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्याच्या प्रतिनिधींबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्रीमती. पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी तथा जनसंपर्क व प्रसिद्धी कक्षाचे समन्वय अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी ८ हजार ४१७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ३८ मतदान केंद्र दुर्गम ठिकाणी असून त्याठिकाणी संप्रेषण सुविधा सक्रिय नाही. मतदान प्रक्रिया सुरळित पार पाडण्याच्या दृष्टीने संप्रेषण सुविधा सक्रिय असणे खूप आवश्यक आहे. दूरसंचार सेवा कंपन्यानी या ३८ मतदान केंद्रांपैकी किती ठिकाणी आपल्या मोबाईल नेटवर्कची रेंज पोहोचते आहे याची पडताळणी करावी. व तशी रेंज उपलब्ध झाली असल्यास या कार्यालयास कळवावे. त्याप्रमाणे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना देऊन पर्यायी व्यवस्था करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

*पूर्वप्रमाणीकरण न झालेल्या मजकुराचे बल्क एसएमएस पाठवू नयेत- डॉ. रवींद्र ठाकूर*
डॉ. ठाकूर म्हणाले, निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस तसेच सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेणे आवश्यक आहे. पूर्वप्रमाणीकरण न केलेल्या मजकुराचे बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेल व्हाईस मेसेजेस दूरसंचार कंपन्यांनी पाठवू नयेत, असेही डॉ. ठाकूर म्हणाले.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments