Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized13 ते 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीत प्रसारमाध्यमांनी निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारित...

13 ते 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीत प्रसारमाध्यमांनी निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारित करु नये* *-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे*

*ठाणे,दि.25(जिमाका):-* सर्वत्र विधानसभा सार्वत्रिक 2024 च्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणूक शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) दि.13 नोव्हेंबर 2024 सकाळी 7 पासून ते दि.20 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत या कालावधीत प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंध केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दि.23 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या 48 तास आधीपासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यत निकालाचे व कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज प्रसिद्ध करु नये. तरी आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन सर्व प्रसारमाध्यमांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रसारमाध्यमांवर निकालाचे अंदाज (Exit Poll) (प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, दूरदर्शन आकाशवाणी) प्रकाशित करू नये. तसे आढळून आल्यास लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 126 अ कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचे आदर्श आचारसंहिता सुरू असून भारतीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments