Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedअनाथ मुलींनी लुटला तुळशीबागेत दिवाळी खरेदीचा आनंद श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव...

अनाथ मुलींनी लुटला तुळशीबागेत दिवाळी खरेदीचा आनंद श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातर्फे आयोजन : मायेचे घरटे प्रकल्प आणि सूर्योदय सोशल फाऊंडेशन मधील मुलींची दिवाळी खरेदी

पुणे : दिवाळी म्हणजे बच्चेकंपनीसाठी विशेष सण. मुलींमध्ये खरेदीचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत असतो. हा उत्साह अनाथ, वंचित विशेष मुलींमध्येही असतोच. इतर मुली जेव्हा खरेदीला जातात तेव्हा त्यांनाही कोणीतरी खरेदीला न्यावे असे वाटते. त्यामुळे या मुलींना आपल्या आवडीनुसार मनसोक्त खरेदी करता यावी, यासाठी श्री तुळशीबाग गणपती मंडळ व तुळशीबाग व्यापारी असोसिएशनच्या वतीने विशेष उपक्रम घेण्यात आला.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातर्फे मायेचे घरटे प्रकल्प आणि सूर्योदय सोशल फाऊंडेशन मधील मुलींना दिवाळी निमित्त खरेदीसाठी तुळशीबागेत नेण्यात आले होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे , मंडळाचे अध्यक्ष विकास पवार उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, डॉ. शैलेश गुजर, अभिनेत्री वाळके, जितेंद्र अंबासनकर, प्रदीप इंगळे, किरण चव्हाण, साई डोंगरे, चकोर सुबंध, सुनंदा इप्ते, लक्ष्मी भावसार, सोनी पवार यावेळी उपस्थित होते. विविध संस्थातील मुलांना खरेदीचा आनंद घेता यावा यासाठी श्री तुळशीबाग गणपती मंडळातर्फे दरवर्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, दिवाळीच्या आनंदापासून वंचित असलेल्या या मुलींना मायेची उब देणारा हा उपक्रम आहे. या मुलींनी शिकून मोठे व्हावे, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांचे करिअर घडवावे अशा शुभेच्छा त्यांनी मुलींना दिल्या.

नितिन पंडीत म्हणाले, संस्थेत जाऊन मुलांना भेटवस्तू देण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष खरेदीचा आनंद देण्यासाठी या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. मुली प्रत्यक्ष दुकानात जाऊन जेव्हा खरेदी करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला समाधान देणारा असतो. तुळशीबाग मंडळ, तुळशीबाग व्यापारी यांच्या सहकार्याने गेली अनेक वर्षे उपक्रम राबवित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments