विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर २०६, पिंपरी (अ.जा.)विधानसभा मतदारसंघ कार्यालयामार्फत गांधीनगर, पिंपरी येथील मदीना मशीद या प्रार्थना स्थळाजवळ मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी उपस्थित बांधवांनी “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धारही केला.
२०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार कार्यालयामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांचे निर्देशानुसार स्वीप उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार मतदार जनजागृती करणेत आली या वेळी माध्यम समन्वयक अधिकारी विजय भोजने, स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच स्वीप कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


