*
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या वतीने दिनांक 20 ते 25 ऑक्टोबर 2024 या दरम्यान आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला स्पर्धेमध्ये भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाने रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कोटा, राजस्थान या विद्यापीठाचा 33-31 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.
अंतिम सामन्यामध्ये सलोनी गजमल तसेच मंदिरा कोमकर यांनी जबरदस्त चढाया करून भारती विद्यापीठ संघाला मोक्याच्या वेळी गुण मिळवून दिले.
बाद फेरीच्या अंतिम सामन्यांमध्ये भारती विद्यापीठ संघाने पुण्याच्याच बालाजी विद्यापीठाचा 50 – 29 असा सहज पराभव करीत साखळी फेरीत प्रवेश केला आणि संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला.
साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यांमध्ये भारती विद्यापीठाच्या संघाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या संघाचा 58 -20 असा एकतर्फी पराभव करत इतर संघांमध्ये दहशत निर्माण केली.
साखळी फेरीच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या संघाचा 45 – 19 असा पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली.
सुवर्णपदक विजेत्या संघाचे
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम , भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक साऊजी, भारती विद्यापीठाच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव , भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलसचिव जी. जयकुमार, भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. सुहास मोहिते व डॉ . राजेंद्र मोहिते, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. नेताजी जाधव आणि भारती विद्यापीठ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्नील विधाते यांनी सुवर्णपदक विजेत्या संघाचे तसेच संघाचे प्रशिक्षक राजेश ढमढेरे आणि व्यवस्थापक प्रा. अमित तांबोळी व प्रा. हैबत पाटील यांचे अभिनंदन केले.


