Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी- निवडणूक निर्णय...

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे*

*

पुणे, दि. 26: भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी बिनचूकपणे पार पाडावी, असे प्रतिपादन इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारीकरीता डॉ. कदम गुरुकुल इंदापूर येथे आयोजित निवडणूकविषयक प्रथम प्रशिक्षणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसोडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशिल पवार, प्रशिक्षक विजयकुमार अत्तार आदी उपस्थित होते.

डॉ. पांढरे म्हणाले, निवडणूक प्रकिया सुरळीत व अचूकपणे पार पाडण्याच्यादृष्टीने मतदासंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तीन टप्प्यात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आज आयोजन करण्यात आले असून सकाळ व दुपार अशा दोन सत्रात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 2 हजार 500 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

यावेळी श्री. पांढरे आणि श्री. अत्तार यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली, यामध्ये मतदानाच्या आदल्यादिवशी करावयाची कार्यवाही तसेच मतदानाच्या दिवशी करावयाच्या अनिवार्य बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत तांत्रिक बाबी, मतदान यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित असल्याबाबतची खातरजमा, मॉक पोल, निवडणूक अनुषंगाने कायदेशीर तरतुदीसाठी महत्त्वाच्या अधिनियमांची माहिती दिली, मतदानादरम्यान भरावयाचे विविध नमुने आदी माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments