Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास निवडणूक निरीक्षकांची भेट*

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास निवडणूक निरीक्षकांची भेट*

*
पुणे, दि. 29 : भारत निवडणूक आयोगाकडून 195 जुन्नर आणि 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून पिगे लिगू यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देवून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.

तहसील कार्यालय आंबेगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी श्री. पिगे लिगू यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक तसेच इतर कक्षाचे समन्वय अधिकारी उपस्थित होते. श्री. पिगे लिगू यांनी अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील स्ट्रॉंग रूम, साहित्य वितरण व स्वीकृती स्थळ तसेच मतदान मोजणी ठिकाणाची पाहणी केली.

मतदार संघातील एकूण मतदार, एकूण मतदान केंद्रे, एकूण क्षेत्रीय अधिकारी, महिला व्यवस्थापित मतदान केंद्र, युथ व्यवस्थापित मतदान केंद्र, अपंग मतदान केंद्र, युनिक मतदान केंद्र, मॉडेल मतदान केंद्र, पर्दानशीन मतदान केंद्र आदी विशेष मतदान केंद्रांची श्री. पिगे लिगू यांनी माहिती घेवून आंबेगाव विधानसभा निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments