Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयास निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. वेंकादेश ...

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयास निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. वेंकादेश बाबु यांनी दिली भेट*

*

पुणे, दि. २९: आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या तहसिल कार्यालय येथे स्थापित करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. वेंकादेश बाबु यांनी भेट देवून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.

निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडीओ पाहणी पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, सी-व्हिजिल तसेच आचार संहिता कक्षामार्फत सूरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक, प्रमिला वाळुंज यांच्यासह विविध कक्षांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते. वाहनांची तपासणी करतांना सूरूवातीपासून व्हिडिओ चित्रिकरण करावे, सर्व पथकांनी निवडणूक काळात अतिदक्षतेने काम करून गैरप्रकारास आळा घालावा, महिला पोलीसांचे पथक नियुक्त करावे, निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम प्राधान्याने व काळजीपूर्वक करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments