Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जिल्हास्तरीय “कॅश सिझर रिलीज समिती” कार्यान्वित*

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जिल्हास्तरीय “कॅश सिझर रिलीज समिती” कार्यान्वित*

*

*ठाणे,दि.30(जिमाका):* – आचारसंहिता काळात भरारी पथक व स्थिर सर्वेक्षण पथकांनी जप्त केलेली रक्कम पडताळणी करुन, परत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार “कॅश सिझर रिलीज समिती” नियुक्त करण्यात आली आहे.
*ही समिती पुढीलप्रमाणे:-*
*अध्यक्ष:* श्री.रोहन घुगे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
*सदस्य:* ठाणे महानगरपालिका मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री.दिलीप सूर्यवंशी, ठाणे जिल्हा परिषद मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री.वैजनाथ बुरडकर, नवी मुंबई महानगरपालिका मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, ठाणे जिल्हा कोषागार अधिकारी श्री.महेश कुमार कारंडे
जिल्ह्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर पासून लागू झाली आहे. आचारसंहिता कालावधीत संयुक्तिक कारणाखेरीज विहीत मर्यादेच्या वर रोख रक्कम बाळगण्यास प्रतिबंध असल्याने अशी रक्कम भरारी पथक व स्थिर सर्व्हेक्षण पथक यांना आढळून आल्यास ती जप्त करण्यात येते. या कार्यवाहीमुळे सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रक्कम बाळगण्याची पडताळणी करण्यासाठी व आवश्यक जप्त केलेली रक्कम परत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार ही समिती नियुक्त करण्यात आली आहे.
नागरिकांना आचारसंहिता कालावधीत जप्त केलेली रक्कम परत घेण्यासाठी रक्कम बाळगण्याबाबत आवश्यक कागदपत्रे, दस्तऐवज, पुराव्यासह ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयाचे लेखा अधिकारी श्री.सुरेंद्र राऊत, (भ्रमणध्वनी क्रमांक 9892698560) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समिती प्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments