पुणे, दि.३१: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक भीम सिंग यांनी मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांचेसह हिशोब तपासणी पथक, वाहन अधिग्रहन व्यवस्थापन वाहतुक आराखडा, स्वीप व्यवस्थापन, ईव्हीएम व्यवस्थापन, जनसंपर्क व प्रसिध्दी कक्ष, मतदार यादी व्यवस्थापन, एक खिडकी कक्ष , मतपत्रिका छपाई व वाटप आदी पथकांमधील नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेमध्ये नि:पक्षपाती, पारदर्शक व अचूकपणे सर्वांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत असे निर्देश श्री. सिंग यांनी दिले. तसेच नामनिर्देशन पत्राच्या छाननी प्रक्रियेवेळी उपस्थित राहून आवश्यक सूचना दिल्या.
निवडणूक निरीक्षक श्री. सिंग यांचा निवासाचा पत्ता ए- ३०५ व्हीव्हीआयपी १ सर्किट हाऊस, (ग्रीन बील्डींग)२४ क्वीन्स् गार्डन, कॅम्प, पुणे असा आहे. संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९२२६५७३६४६ असा आहे. श्री. सिंग यांना व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे भेटण्याची वेळ सोमवार, बुधवार व शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत राहील, असे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
000


