पुणे, दि. ३१: भारत निवडणूक आयोगाकडून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाकरीता ललित कुमार दाहिमा यांची मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी येरवडा येथील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते-पाटील उपस्थित होत्या.
श्री.ललित कुमार यांनी विधानसभा मतदारसंघ कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक कक्षाच्या कामकाजाबाबत निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला.
श्री. ललित कुमार यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए 302 असा असून संपर्क क्रमांक 9226825574 हा आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी श्री मिलिंद टांकसाळे हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9922612614 हा आहे.


