पुणे, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेखे तपासणीच्या तरतूदीनुसार आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षकांमार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात ही तपासणी करण्यात येईल. खर्च तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी 9 नोव्हेंबर रोजी तर दुसरी 13 नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.


