*
पुणे, दि.४: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर झाले असून ही तपासणी मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक उमेश कुमार यांचे मार्फत खर्च नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक पाच तिसरा मजला अर्सेनल प्लॉट सागर प्लाझा समोर कॅम्प पुणे येथे करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे.
खर्च तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ९, दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. तरी या दिनांकास उमेदवार व त्यांचे अधिकृत खर्च प्रतिनिधी यांनी निवडणुकांसंदर्भातील खर्चांचे सर्व दस्तऐवज, दैनंदिन खर्च नोंदवही, मुळ प्रमाणके, अद्ययावत बँक स्टेटमेंटस, पासबुक या सहित वेळेत पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा निवडणूक कार्यालयातील खर्च नियंत्रण कक्षात उपस्थित रहावे, असेही श्री. भंडारे यांनी कळविले आहे.
000


