*
पुणे, दि.४ :- हडपसर विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे निवडणूक दैनंदिन खर्च लेख्यांची तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही तपासणी तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. हडपसर विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक खर्च पर्यवेक्षक उमेश कुमार यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे.
उमेदवारांच्या निवडणूक दैनंदिन खर्च लेख्यांची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर, दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर रोजी व तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता हडपसर विधानसभा मतदार संघाचे कार्यालय – विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह, हडपसर येथे होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी दिली आहे.
000p


