Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedवर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एंटरटेन्मेंट समिट (वेव्हज्‌‍) 2025 आणि क्रिएट इन इंडिया...

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एंटरटेन्मेंट समिट (वेव्हज्‌‍) 2025 आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंजला समर्थन देण्यासाठी आयडीजीएस आणि सीआयआय तर्फे पुण्यात रोड शो संपन्न

पुणे,6 नोव्हेंबर 2024 : द इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटी (आयडीजीएस) आणि कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्या सहकार्याने वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एंटरटेन्मेंट समिट (वेव्हज्‌‍) 2025 आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंजला समर्थन देण्यासाठी पुण्यात रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विशेष सचिव नीरजा सेखर यांनी बीजभाषण केले. याप्रसंगी आयडीजीएसचे संचालक आणि जेटलाईन ग्रुप ॲन्ड जेटसिंथेसिसचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन नवाणी,एनएफडीसीचे सरव्यवस्थापक अजय ढोके,सीआयआय दिल्लीच्या उप सरसंचालक अमिता सरकार आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतातील मीडिया ॲन्ड एंटरटेन्मेंट (एमॲन्डई) उद्योगाच्या प्रसारासाठी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय तर्फे दिल्ली येथे 5 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एंटरटेन्मेंट समिट (वेव्हज्‌‍) 2025 आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंज चे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त ॲनिमेशन,व्हिज्युअल इफेक्टस,गेमिंग,कॉमिक्स,इमर्सिव्ह रिऍलिटीज या क्षेत्रातील भागधारकांपर्यंत पोहचण्यासाठी वेव्हज्‌‍ रोड शो चे आयोजन करण्यात येत आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विशेष सचिव नीरजा सेखर म्हणाल्या की, मीडिया ॲन्ड एंटरटेन्मेंट उद्योगात अनेक क्षेत्रे आहेत.त्यांचा एकमेकांशी संवाद होणे गरजेचे आहे.आशय निर्मिती,त्याचा प्रसार आणि वितरण यासाठी व्यासपीठाची गरज आहे.पॉडकास्ट,रील्स,व्हीएफएक्स,कॉमिक्स यासारख्या प्रकारातील भारतात निर्माण झालेल्या मनोरंजनात्मक आशयाला योग्य व्यासपीठाची गरज आहे.हे लक्षात घेता पुढील वर्षी दिल्ली येथे वेव्हज्‌‍ या ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे.

आयडीजीएसचे संचालक आणि जेटलाईन ग्रुप ॲन्ड जेटसिंथेसिसचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन नवाणी म्हणाले की, आशयाच्या वापरामध्ये आजच्या काळात आमुलाग्र बदल झाला आहे.सरकार,खासगी क्षेत्रे आणि आयडीजीएस व सीआयआयसारख्या उद्योग संघटना एकत्र येऊन एक जबाबदार वातावरणाची निर्मिती करत देशातील कंपन्या भारतालाच नव्हे तर जगभराला मूल्यवर्धित सेवा पुरवतील.वेव्हज्‌‍ ही एक अभिनव कल्पना असून मीडिया ॲन्ड इंडस्ट्री उद्योगाला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

एनएफडीसीचे सरव्यवस्थापक अजय ढोके यांनी वेव्हज्‌‍मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धांबाबत माहिती दिली.

सीआयआय दिल्लीच्या उप सरसंचालक अमिता सरकार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments