*
पुणे,दि.०६:- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक मानवेश सिंग सिद्धू यांनी पिंपरी येथील म्हाडा कॉलनी मोरवाडी परिसरातील एसएनबीपी शाळेतील मतदान केंद्रास भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निवडणूक यंत्रणेला निर्देश दिले.
संपर्क अधिकारी मुकुंद पवार, हरविंदर सिंग बन्सल,देवन्ना गट्टुवार, समन्वय अधिकारी विनायक माने, विजय भोजने, मतदान केंद्र व्यवस्था समन्वय अधिकारी गिरीश गुंठे यावेळी उपस्थित होते.
०००


