Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedहडपसर विधानसभा मतदारसंघात सहाय्यकारी मतदान केंद्र व मतदान केंद्रांच्या जागेमध्ये बदलास मान्यता*

हडपसर विधानसभा मतदारसंघात सहाय्यकारी मतदान केंद्र व मतदान केंद्रांच्या जागेमध्ये बदलास मान्यता*

*

पुणे, दि.६: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने २१३ हडपसर विधानसभा मतदार संघात नव्याने ७ सहाय्यकारी मतदान केंद्रास व १४७ मतदान केंद्राच्या जागेमध्ये बदल करण्यास भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्निल मोरे यांनी कळविली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नंतर मतदान केंद्र सूसुत्रीकरणामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ७ सहाय्यकारी मतदान केंद्र व १४७ मतदान केंद्राच्या जागेमध्ये बदल करण्यात येणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात मूळ ५२५ मतदान केंद्र असून ७ सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत. एकूण ५३२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे असेही डॉ. मोरे यांनी कळविले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments