Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedभोर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल*

भोर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल*

*
पुणे, दि.६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भोर विधानसभा मतदार संघातील दीड हजार पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांचे विभाजन करण्यात आले असून गृहनिर्माण संस्थामध्ये नव्याने मतदान केंद्र स्थापन करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी कळविली आहे.

पूर्वीचे मतदान केंद्र व केंद्र क्रमांक व नवीन केंद्राचे नाव व केंद्र क्रमांकाची माहिती अशी; केंद्र क्रमांक ३६ नरसिंह विद्यालय ताथवडे ता. मुळशी, बिल्डिंग पूर्वेकडे तोंड करुन खोली क्रमांक ४ येथील केंद्र स्कायस्क्रापर हाऊसिंग सोसायटी क्लब हाऊस, अशोकनगर, ताथवडे येथे, केंद्र क्रमांक ५२- ब्लू रिज पब्लिक स्कूल हिंजवडी, ता. मुळशी उत्तराभिमुख खोली ४ ऐवजी ब्लू रिज हाऊसिंग सोसायटी, युनिट-सी, क्लब हाऊस, भाग १,हिंजवडी येथे, केंद्र क्रमांक ५३- ब्लू रिज पब्लिक स्कूल हिंजवडी, ता. मुळशी उत्तराभिमुख खोली ३ फॉर्म पश्चिम ऐवजी ब्लू रिज हाऊसिंग सोसायटी, युनिट-सी, क्लब हाऊस, भाग २,हिंजवडी येथे, केंद्र क्रमांक ६५- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माण तालुका मुळशी गावठाण इमारत पूर्वेकडे, दक्षिणेकडून खोली क्रमांक ४ येथील मतदान केंद्र क्रमांक ६५ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण तालुका मुळशी गावठाण इमारत पूर्वेकडे, दक्षिणेकडून खोली क्रमांक ४ व केंद्र क्रमांक ६६ येथे आयट्रेण्ड हाउसिंग सोसायटी, फेज२, माण येथे स्थलांतरित केले आहे.

मतदान केंद्र क्रमांक 67 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईरवाडी, तालुका मुळशी पूर्वाभिमुख इमारत दक्षिणेकडून खोली क्रमांक २ येथील मतदान केंद्र ६८ व ६९ या केंद्रांमध्ये विभाजित करण्यात आले आहे. त्यानुसार केंद्र क्रमांक ६८- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईरवाडी तालुका मुळशी, पूर्वाभिमुख इमारत, दक्षिणेकडून खोली क्रमांक २ व सनवे मेगापॉलीस हाऊसिंग सोसायटी, माण फेज ३, ए-१६ बिल्डिंग समोर, पोडियम २, तळमजला पार्किंग, पूर्व बाजूस, पश्चिमेकडे तोंड करून या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. केंद्र क्रमांक १४६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरे, तालुका मुळशी पूर्वमुखी इमारत खोली क्रमांक २ व केंद्र क्रमांक १४७ अंगणवाडी इमारत शेरे, तालुका मुळशी खोली क्रमांक १ येथील मतदान केंद्र क्रमांक १४८- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरे, तालुका मुळशी पूर्वमुखी इमारत खोली क्रमांक २ या ठिकाणी, केंद्र क्रमांक १७२ येथील मतदान केंद्र क्रमांक १७३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुगाव, तालुका मुळशी, पूर्वेकडून दक्षिण खोली क्रमांक २ कडे तोंड करून नवीन इमारत येथे तसेच केंद्र क्रमांक १७४- श्री श्री रविशंकर विद्यामंदिर भुगाव, उत्तर दक्षिण इमारत दक्षिणेकडून खोली क्रमांक २ या दोन ठिकाणी विभागून स्थापन करण्यात आले आहे. पूर्वीचे केंद्र क्रमांक ३४० येथील मतदान केंद्र ३४० व ३४१ या दोन केंद्रांमध्ये विभागून अनुक्रमे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालवड, एक वर्गीय शाळा, पूर्वपश्चिम इमारत उत्तरमुखी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोपडेवाडी, पूर्वपश्चिम इमारत, दक्षिणमुखी पूर्वेकडून खोली क्रमांक १ या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे.

भोर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांचे विभाजन व नवीन मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेल्या बदलाची नोंद नागरिकांनी घ्यावी असे आवाहन श्री खरात यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments