Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमतेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदान करणार – तृतीयपंथी मतदार

समतेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदान करणार – तृतीयपंथी मतदार

पिंपरी, दि. ७ नोव्हेंबर २०२४* :मतदान हे समतेचे प्रतिक असून भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान मताचा अधिकार दिला आहे. समतेच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या उत्साहाने मतदान करणार असल्याचे मत तृतीयपंथी मतदारांनी व्यक्त केले.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज महापालिकेच्या मुख्य पप्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात तसेच रुपीनगर तळवडे येथे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या मतदार जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने तृतीयपंथी मतदार तसेच तृतीयपंथी कर्मचारी यांच्यासह सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, किसन केंगले, अभिजित डोळस, विकास गायकांबळे, ओंकार पवार, पियुष घसिंग, सचिन महाजन आदी कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या प्रांगणात उपस्थित तृतीयपंथी कर्मचाऱ्यांनी येत्या निवडणुकीत उत्साहाने मतदान करणार असल्याचे सांगितले. तसेच आपल्या परिसरातील मित्रमंडळी व सहकाऱ्यांना मताचा हक्क बजावण्याबाबत आवाहन करणार असल्याचेही सांगितले.

रुपीनगर तळवडे येथे पार पडलेल्या मतदार जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने तृतीयपंथी मतदार उपस्थित होते. तृतीयपंथी घटकाच्या प्रश्नांची जाणीव असलेला प्रतिनिधी आपल्या मताच्या जोरावर विधानसभेत पाठविण्यासाठी मताचा अधिकार हा महत्वपूर्ण अधिकार असून त्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये नचुकता मतदान करणार असल्याचे तृतीयपंथी मतदारांनी सांगितले. तसेच नारी वूमन संस्थेच्या वतीने देखील तृतीयपंथी मतदारांना मतदान करण्याबाबत प्रेरित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments