Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतातील प्रोफेशनल्‍सचा स्‍वत:च्‍या करिअरला पुन्‍हा नव्‍याने सुरू करण्‍याचा मनसुबा; ८८ टक्‍के प्रोफेशनल्‍स...

भारतातील प्रोफेशनल्‍सचा स्‍वत:च्‍या करिअरला पुन्‍हा नव्‍याने सुरू करण्‍याचा मनसुबा; ८८ टक्‍के प्रोफेशनल्‍स २०२४ मध्‍ये नवीन नोकरीचा विचार करत आहेत

भारत, १७ जानेवारी २०२४: आर्थिक अनिश्चिततेमुळे प्रोफेशनल्‍स आता त्‍यांच्‍या करिअरमध्‍ये बदल करण्‍याबाबत विचार करत आहेत. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल्‍स नेटवर्क लिंक्‍डइनच्‍या नवीन संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, भारतातील जवळपास १० पैकी ९ (८८ टक्‍के) प्रोफेशनल्‍स २०२४ मध्‍ये नवीन नोकरीचा विचार करत आहेत, ज्‍यामध्‍ये २०२३ च्‍या तुलनेत वार्षिक ४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

 

यामधून वृत्तींमध्‍ये बदल दिसून येतो, जेथे प्रोफेशनल्‍स आता एकाच नोकरीवर अवलंबून न राहता स्‍वत:च्‍या करिअरला नव्‍या उंचीवर नेण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. उत्‍पादकता व करिअर विकासावर लक्ष केंद्रित करत प्रोफेशनल्‍सचा वाया गेलेल्‍या वेळेची भरपाई करण्‍याचा मनसुबा आहे. लिंक्‍डइन डेटामधून निदर्शनास येते की, त्‍यांच्‍या व्‍यासपीठावर नोकरी शोधण्‍यामध्‍ये २०२२ च्‍या तुलनेत २०२३ मध्‍ये वार्षिक ९ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

 

आव्‍हानात्‍मक आर्थिक स्थितीमध्‍ये काम आणि जीवनामध्‍ये उत्तम संतुलनाची इच्‍छा (४२ टक्‍के) आणि उच्‍च पगाराची गरज (३७ टक्‍के) हे रोजगारामध्‍ये परिवर्तनासाठी सर्वात मोठे प्रेरक स्रोत आहेत. प्रोफेशनल्‍स नवीन करिअर मार्गांचा शोध घेण्‍यास देखील उत्‍सुक आहेत, जेथे १० पैकी जवळपास ८ (७९ टक्‍के) भारतीय प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की, ते त्‍यांचे उद्योग किंवा व्‍यतिरिक्‍त संधींचा शोध घेत आहेत.

 

प्रोफेशनल्‍सना इच्छित रोजगारांशी त्‍यांची कौशल्‍ये जुळवून घेण्‍यास आव्‍हानात्‍मक वाटत आहे

 

प्रोफेशनल्‍स उत्‍साही असले तरी त्‍यांना एआयमधील झपाट्याने होत असलेल्‍या विकासामुळे काही रोजगार करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या कौशल्‍यांमधील परिवर्तनाशी जुळवून घेणे आव्‍हानात्‍मक वाटत आहे. जवळपास अर्धे (४५ टक्‍के) प्रोफेशनल्‍स म्‍हणाले की, त्‍यांना इच्छीत रोजगाराशी त्‍यांची कौशल्‍ये जुळवून घेण्‍याच्‍या पद्धती माहित नाहीत, त्‍यामुळे नोकरी शोधण्‍याची प्रक्रिया अधिक अवघड होते. लिंक्‍डइन डेटामधून निदर्शनास येते की, भारतात २०१५ पासून नोकऱ्यांसाठी आवश्‍यक कौशल्‍यांमध्‍ये ३० टक्‍क्‍यांनी बदल झाला आहे. प्रोफेशनल्‍सना नोकरी शोधताना देखील आव्‍हानांचा सामना करावा लागत आहे, जेथे ५५ टक्‍के प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की, नोकरी शोधणे निराशाजनक आहे आणि ५९ टक्‍के प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की, त्‍यांना क्‍वचितच रिक्रूटर्सकडून प्रतिसाद मिळतो.

 

प्रोफेशनल्‍स इतरांपेक्षा वरचढ ठरण्‍याकरिता त्‍यांच्‍या नोकरी शोधण्‍याचा दृष्टिकोन बदलत आहेत

 

खडतर स्‍पर्धेदरम्‍यान प्रोफेशनल्‍स इतरांपेक्षा वरचढ ठरण्‍याकरिता त्‍यांच्‍या नोकरी शोधण्‍याचा दृष्टिकोन बदल आहेत. ७२ टक्‍के प्रोफेशनल्‍स म्‍हणाले की, त्‍यांनी त्‍यांचा नोकरी शोधण्‍याचा दृष्टिकोन बदलला आहे, जसे व्हिडिओ व डिजिटल रिझ्यूम्‍स अशा नवीन फॉर्मेट्ससह ते प्रयोग करत आहेत. ते एआयचा वापर करण्‍यास देखील उत्‍सुक आहेत, जेथे ८१ टक्‍के प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की, यामुळे त्‍यांना अधिक कार्यक्षमपणे व उत्‍पादनक्षमपणे रोजगाराचा शोध घेण्‍यास मदत होऊ शकते.

 

ते त्‍यांचा प्रोफेशनल्‍स ब्रॅण्‍ड तयार करत आणि कनेक्‍शन्‍स वाढवत त्‍यांच्‍या करिअरवर नियंत्रण देखील ठेवत आहेत, ज्‍यामुळे त्‍यांना रोजगार मिळण्‍याची शक्‍यता वाढण्‍यास मदत होऊ शकते. ७९ टक्‍के प्रोफेशनल्‍स लिंक्‍डइनवर अधि‍काधिक कन्‍टेन्‍ट पोस्‍ट करत आहेत आणि ८३ टक्‍के प्रोफेशनल्‍स त्‍यांचे प्रोफेशनल्‍स नेटवर्क वाढवण्‍यामध्‍ये अधिक सक्रिय होत आहेत.

 

लिंक्‍डइन इंडियासाठी करिअर एक्‍स्‍पर्ट व सीनियर मॅनेजिंग एडिटर निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, Career Expert and Sr. Managing Editor for LinkedIn India) म्‍हणाल्‍या, ”भारतीय प्रोफेशनल्‍स २०२४ मध्‍ये आपल्‍या करिअरला अधिक प्राधान्‍य देत असल्‍यामुळे रोजगार बाजारपेठेत अधिकाधिक प्रोफेशनल्‍सच्‍या प्रवेशासह स्‍पर्धा अधिक खडतर होईल. रोजगार शोधण्‍यात यशस्‍वी होण्‍यासाठी प्रोफेशनल्‍सना त्‍यांच्‍या प्रोफाइल्‍समध्‍ये वाढ करत, त्‍यांची कौशल्‍ये दाखवत आणि उद्योगामध्‍ये होत असलेल्‍या विकासामध्‍ये माहितीपूर्ण राहत इतरांपेक्षा वरचढ ठरणे आवश्‍यक आहे. यामुळे इच्छित नोकरी मिळण्‍याच्‍या शक्‍यतेमध्‍ये वाढ होण्‍यास, तसेच अग्रणी राहत करिअर घडवण्‍यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍ये विकसित होण्‍यास मदत होईल.”

 

लिंक्‍डइनने प्रोफेशनल्‍सना मदत करण्‍यासाठी मोफत लिंक्‍डइन लर्निंग कोर्सेस देखील सादर केले आहेत, जसे A Career Strategist’s Guide to Getting a Job; Navigating Your Career Through Restructuring, Layoffs, and Furloughs आणि Recession-Proof Career Strategies. हे कोर्सेस १७ जानेवारी २०२४ पासून १ जुलै २०२४ पर्यंत उपलब्‍ध आहेत.

 

जॉब्‍स ऑन द राइज – झपाट्याने विकसित होत असलेली पदे व ट्रेण्‍ड्स कामाच्‍या भवितव्‍याला नव्‍या उंचीवर नेत आहेत

 

लिंक्‍डइनची नवीन ‘जॉब्‍स ऑन द राइज’ यादी गेल्‍या पाच वर्षांमध्‍ये झपाट्याने विकसित होत असलेल्‍या रोजगारांबाबत नवीन माहिती प्रदान करते, ज्‍यामधून कामाच्‍या भवितव्‍याला नव्‍या उंचीवर नेणारे ट्रेण्‍ड्स आणि दीर्घकालीन संधी कुठे मिळतील हे निदर्शनास येते. भारतात क्‍लोजिंग मॅनेजर, इन्‍फ्लूएन्‍सर मार्केटिंग स्‍पेशालिस्‍ट व डिझाइन स्‍पेशालिस्‍ट हे २०२४ मधील अव्‍वल तीन झपाट्याने विकसित होत असलेले रोजगार आहेत, ज्‍यांचा विकास दर ७९ टक्‍क्‍यांहून अधिक आहे. भारतातील ‘टॉप १५’ झपाट्याने विकसित होणाऱ्या रोजगारांची माहिती खाली देण्‍यात आलेल्‍या परिशिष्‍टमध्‍ये मिळू शकते.

 

लिंक्‍डइनकडून प्रोफेशनल्‍सना त्‍यांच्‍या रोजगार शोधामध्‍ये अग्रणी राहण्‍यास मदत करण्‍यासाठी नवीन वैशिष्ट्ये सादर

 

प्रोफेशनल्‍सना इतरांपेक्षा अग्रस्‍थानी व वरचढ राहण्‍यास मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइन दोन नवीन रोजगार वैशिष्‍ट्ये सादर करत आहेत, जी प्रोफेशनल्‍सना त्‍यांच्‍या रोजगार शोधामध्‍ये अधिक साह्य करतात: जॉब कलेक्‍शन्‍स आणि न्‍यू प्रीफरन्‍सेस् फिचर्स. नवीन करिअर मार्गांचा शोध घेण्‍याची किंवा आपल्‍या क्षमतांमध्‍ये वाढ करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या प्रोफेशनल्‍ससाठी डिझाइन करण्‍यात आलेले लिंक्‍डइन आता प्रो स्‍पोर्ट्स जॉब्‍स, रिमोट जॉब्‍स किंवा स्‍टार्टअप्‍स येथे नोकऱ्या अशा विविध प्रकारचे उद्योग, स्‍पेशालिटीज व कंपन्‍यांमधील वैयक्तिकृत व संबंधित रोजगारांचे कलेक्‍शन्‍स दाखवेल, तसेच तुमच्‍या पसंतींनुसार योग्‍य लोकेशन व रोजगाराचा प्रकार अशा बाबींना देखील दाखवेल.

 

आपल्‍या करिअरला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या प्रिमिअम सबस्‍क्रायबर्ससाठी लिंक्‍डइनने नुकतेच Top Choice सारखी नवीन वैशिष्‍ट्ये सादर केली आहेत. टॉप चॉईस वैशिष्‍ट्य रिक्रूटर्सच्‍या निदर्शनास आणते की, त्‍यांनी पोस्‍ट केलेल्‍या पदाबाबत त्‍यांची प्रबळ इच्‍छा आहे. यामुळे त्‍यांची दृश्‍यमानता वाढण्‍यास मदत होऊ शकते. त्‍यांना टॉप चॉईसचा वापर करताना रिक्रूटरकडून पुन्‍हा मेसेज मिळण्‍याची ४३ टक्‍के अधिक शक्‍यता आहे. सबस्‍क्रायबर्स देखील त्‍यांच्‍या शोधामध्‍ये वाढ करू शकतात आणि त्‍यांच्‍या नेटवर्कमध्‍ये अॅक्टिव्‍हली हायरिंग किंवा बाहेर असलेल्‍यांना पाहण्‍यासाठी पीपल सर्च कमी करत, तसेच टॉप अॅप्‍लीकण्‍ट आहे का हे पाहण्‍यासाठी जॉब्‍स फिल्‍टर करत वेळेची बचत करू शकतात. लिंक्‍डइनने एआय-समर्थित अनुभव देखील सादर करण्‍यास सुरूवात केली आहे (started to roll out), ज्‍यामुळे प्रोफेशनल्‍ससाठी रोजगार शोधणे जलद, सुलभ व स्‍मार्टर होण्‍यास मदत होईल.

 

२०२४ मध्‍ये रोजगार शोधावर अधिक नियंत्रण ठेवण्‍यासाठी लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट टिप्‍स:

 

● सर्वोत्तम प्रोफाइल तयार करा: तुमचा लिंक्‍डइन प्रोफाइल इतरांपेक्षा वरचढ असण्‍यसााठी अद्ययावत ठेवण्‍याची खात्री घ्‍या. तुमची पार्श्‍वभूमी थोडक्‍यात समाविष्‍ट करण्‍याची आणि प्रमुख कौशल्‍यांची नोंद करण्‍याची खात्री घ्‍या. तुम्‍ही रिक्रूटर्स आणि तुमच्‍या नेटवर्कला तुमच्‍या प्रोफाइलवर “Open to Work” feature सक्षम करत नवीन संधींना प्रतिसाद देण्‍यास सज्‍ज असल्‍याची माहिती देऊ शकता. प्रो टिप म्‍हणजे तुम्‍ही तुमच्‍या प्रोफाइलचे हेडलाइन व अबाऊट सेक्‍शन्‍स तयार करण्‍यासाठी नवीन एआय-समर्थित प्रिमिअम टूल्‍सचा वापर करू शकता.

 

● रोजगार शोधत नसताना देखील स्‍वत:च्‍या नेटवर्ककडे लक्ष द्या: योग्‍य संधी मिळण्‍यासाठी उत्तम कनेक्‍शन्‍स असणे महत्त्वाचे आहे. महणून नेटवर्क निर्माण करण्‍यास अद्ययावत करण्‍याची खात्री घ्‍या. सतत कनेक्‍शन्‍सपर्यंत पोहोचणे आणि वेळोवेळी लिंक्‍डइनवरील त्‍यांच्‍या पोस्‍ट्सशी संलग्‍न होणे यामुळे प्रबळ संबंध स्‍थापित होण्‍यास मदत होऊ शकते, ज्‍यामुळे संभाव्‍य रोजगार संधी देखील मिळू शकतात. हीच बाब व्‍यवस्‍थापकांची नियुक्‍ती करण्‍यासाठी देखील लागू होते.

 

● विकासाच्‍या संधीचा कसा शोध घ्‍यावा हे जाणून घ्‍या: लिंक्‍डइनकडे नवीन उत्तम रोजगार आणि ते मिळण्‍यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍ये याबाबत सविस्‍तर माहिती आहे. स्‍पॉइलर अलर्ट एआयबाबत आजही शहरामध्‍ये चर्चा होते. वार्षिक ‘जॉब्‍स ऑन द राइज’ यादीमध्‍ये नोकरीसाधकांसाठी महत्त्वाची माहिती आहे, जसे कौशल्‍ये (आणि ते निर्माण करण्‍यासाठी लिंक्‍डइन लर्निंग कोर्सेस), टॉप हायरिंग लोकेशन्‍स आणि प्रत्‍येक पदासाठी रिमोट/हायब्रिड उपलब्‍धता, ज्‍यामुळे रोजगार शोध अधिक उत्‍पादनक्षम व कार्यक्षम होऊन जातो.

 

● योग्‍य रोजगार शोधा: तुमच्‍या क्षमता वाढवण्‍यासाठी विविध उद्योग, स्‍पेशालिटीज आणि कंपन्‍यांमधील संबंधित रोजगारांचा शोध घेण्‍याकरिता लिंक्‍डइनच्‍या नवीन जॉब कलेक्‍शन्‍स वैशिष्‍ट्याचा वापर करा. सुपर लिनीयर करिअर मार्ग आता भूतकाळ झाले आहेत. कलेक्‍शन्स सर्जनशील करिअर मार्गांचा अवलंब करण्‍यास आणि पूर्वी विचार न केलेल्‍या पदांसाठी प्रेरित करण्‍यास मदत करू शकतात.

 

● तुमचा शोध अधिक उत्‍पादनक्षम बनवा: नवीन रोजगाराचा शोध घेणे वेळखाऊ आणि तणावग्रस्‍त ठरू शकते, पण लिंक्‍डइनवरील प्रीफरन्‍सेस सारखी टूल्‍स तुमच्‍या पसंतीनुसार रोजगाराची निवड व व्यवस्‍थापन सुलभ करतात. ज्‍यामुळे तुम्‍ही या संधींचा फायदा घेऊ शकता आणि विकास व योग्‍य रोजगारासाठी शक्‍यता वाढण्‍याची खात्री घेऊ शकता. हे प्रीफरन्‍सेस निर्धारित केल्‍यानंतर आम्‍ही त्‍यांना हिरव्‍या रंगामध्‍ये दाखवू, ज्‍यामुळे तुम्‍हाला सर्वात अनुकूल संधींचे त्‍वरित मूल्‍यांकन करण्‍यास मदत होईल. अधिक वेळ वाचवायचा आहे का? प्रिमिअम सबस्‍क्रायबर्स आता त्‍यांच्‍या नेटवर्कमध्‍ये अॅक्टिव्‍हली हायरिंग किंवा बाहेर असलेल्‍यांना पाहण्‍यासाठी पीपल सर्च कमी करू शकतात, तसेच टॉप अॅप्‍लीकण्‍ट आहे का हे पाहण्‍यासाठी जॉब्‍स फिल्‍टर करू शकतात.

 

परिशिष्‍ट: भारतासाठी लिंक्‍डइनची ‘जॉब्‍स ऑन द राइज’ यादी:

 

क्‍लोजिंग मॅनेजर

इन्‍फ्यूएन्‍सर मार्केटिंग स्‍पेशलिस्‍ट

डिझाइन स्‍पेशलिस्‍ट

ड्रोन पायलट

रिक्रूटर

सेल्‍स डेव्‍हलपमेंट रिप्रीझेन्‍टेटिव्‍ह

डिमांड जनरेशन असोसिएट

कस्‍टम्‍स ऑफिसर

ग्रोथ मॅनेजर

इन्‍व्‍हेस्‍टर रिलेशन्‍स मॅनेजर

पॉलिटिकल अॅनालिस्‍ट

डिलिव्‍हरी कन्‍सल्‍टण्‍ट

क्‍लायण्‍ट अडवायजर

क्रिएटिव्‍ह स्‍ट्रॅटे

जिस्‍ट

चीफ रेव्‍हेन्‍यू ऑफिसर

++

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments