Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रीनसेल मोबिलिटीकडून अयोध्येला २ दशलक्ष भाविकांच्या प्रवाशांसाठी १५० इलेक्ट्रिक बसेसचा ताफा

ग्रीनसेल मोबिलिटीकडून अयोध्येला २ दशलक्ष भाविकांच्या प्रवाशांसाठी १५० इलेक्ट्रिक बसेसचा ताफा

दर महिन्याला जवळपास ६०० टन टेलपाइप ऊत्सर्जनाची बचत करून अयोध्येला पर्यावरण स्नेही पर्यटन केंद्र बनवणार

 

मुंबई, भारत; १६ जानेवारी २०२४: – ग्रीनसेल मोबिलिटी ही आघाडीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स कंपनी अत्यंत अभिमानाने घोषित करते की, नगर परिवहन कंपनीने अयोध्येतील अत्यंत महत्त्वपूर्ण राम मंदिर अभिषेक सोहळ्यासाठी १५० इंट्रा-सिटी इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी भागीदार म्हणून ग्रीनसेल मोबिलिटीची निवड केली आहे. हा ताफा अयोध्येतील अंदाजे २ दशलक्ष भाविकांना जानेवारीच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत शहरांतर्गत वाहतूक सेवा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्यात यात्रेकरू आणि श्रद्धावानांसाठी एक महत्त्वपूर्ण कालावधी असलेल्या समारंभाचा दिवस आणि आसपासच्या दिवसांचा समावेश आहे.

 

शाश्वत वाहतूकीत आघाडीची कंपनी असलेल्या ग्रीनसेल मोबिलिटीला या कार्यक्रमादरम्यान लाखो प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक म्हणून आपल्या बसेस उपलब्ध करून देण्याचा मान मिळाला आहे. अयोध्येला मार्च २०२४ पर्यंत अडीच कोटींहून अधिक भाविक भेट देतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे त्याला पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र ठरवण्यासाठी या बसेस महत्त्वाच्या आहेत. या १५० इलेक्ट्रिक बसेसचा वापर कंपनीच्या पर्यावरणपूरक उपायांसाठीच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. त्यामुळे मासिक सुमारे ६०० टन टेलपाइप उत्सर्जन टाळून कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरित्या कमी होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी १४ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत या बसेसना हिरवा झेंडा दाखवला.

 

ग्रीनसेल मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र चावला म्हणाले की, “आमच्या बसेस शहरात तैनात करून अयोध्येला पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र बनण्याचा भाग झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. शाश्वत वाहतूक उपायांना प्रोत्साहन देणे हे कायमच आमचे ध्येय राहिले आहे आणि या भव्य सोहळ्यासाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर करण्याचा सरकारचा निर्णय आमच्या दृष्टीकोनाला प्रोत्साहन देणारा आहे. केवळ प्रवाशांना वाहून नेण्यापुरतेच नाही तर हा दृष्टीकोन स्वच्छ आणि हरित भविष्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.”

 

या कार्यक्रमादरम्यान इलेक्ट्रिक बसेसचा वापर हे भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मुख्यत्वे अशा महत्त्वाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक गरजा व्यवस्थापित करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसची व्यावहारिकता आणि कार्यक्षमता यातून दिसून येईल.

 

ग्रीनसेल मोबिलिटीने उत्तर प्रदेशात ७०० पेक्षा जास्त बसेसचा ताफा तैनात केला आहे. त्यामुळे वार्षिक २२,००० टन टेलपाइप उत्सर्जनाची बचत होते. अयोध्येतील या १५० बसेससह, ग्रीनसेल मोबिलिटी राज्यासोबत ब्रँडची भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीचे संपूर्ण विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करण्यासाठी उत्सु

क आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments