‘
पुणे,१३ नोव्हेंबर : विधी शाखेत करियर करणार्यांसाठी गुणवत्तपूर्ण विधी शिक्षणाचे नवीन पर्व सुरू करून त्यांचा सर्वांगिण विकास घडविण्याच्या उद्देशाने ‘हम अलार्ड है, हम अलग है’, या घोषवाक्याने सुरू झालेल्या अलार्ड युनिव्हर्सिटी तर्फे ‘अलार्ड स्कूल ऑफ लॉ’ ही नवी शाखा सुरू करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न बी. वरळे यांच्या हस्ते शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. हिंजवडी येथील अलार्ड विद्यापीठात याचे उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलार्ड विद्यापीठाचे कुलाधिपति डॉ. एल.आर.यादव हे असतील. विद्यापीठाच्या इतिहासातील महत्वाच्या या टप्प्यावर विधी शाखेतील डीन, डायरेक्टर, प्राध्यापक आणि विद्यापीठातील विविध शाखेतील डीन, डायरेक्टर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अलार्ड शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राम यादव यांनी दिली.
अलार्ड स्कूल ऑफ लॉ’ चे उद्घाटन १६ नोव्हेंबर रोजी
RELATED ARTICLES


